नवी मुंबई काँग्रेसमध्ये गटबाजी कायम, पक्षामध्ये दोन गट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:02 AM2019-04-16T00:02:25+5:302019-04-16T00:02:27+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे.
नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. मुख्य कार्यकारिणी व युवक काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसू लागला आहे. दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप केला आहे.
उपमहापौर निवडणुकीच्या दरम्यान नवी मुंबई काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले आहेत. यानंतर जिल्हा कार्यकारिणीची निवड व शहरातील पदाधिकाºयांच्या नियुक्त्यांनंतरही गटबाजी सुरूच आहे. जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक व इतर पदाधिकारी यांचा एक गट असून दुसरीकडे माजी जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत असे दोन गट तयार झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्येही दोन्ही गटांकडून स्वतंत्रपणे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार सुरू आहे. युवक काँगे्रसचे ठाणे लोकसभा मतदार संघ कार्यक्षेत्राचे अध्यक्ष निशांत भगत यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेवून चलो घर- घर अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. शहरातील काँग्रेसच्या मुख्य कार्यकारिणीच्या पदाधिकाºयांकडून युवक काँग्रेसला डावलण्यात येत आहे. विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप भगत यांनी केला. ठाणे लोकसभा मतदार संघातील आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांचा प्रचार करण्यासाठी काँग्रेस युवकांच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरी जाऊन काँग्रेसच्या योजनांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले. यावेळी
काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, विजय वाळुंज, सिद्धार्थ अवधूत, मयूर जैसवाल आदी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँगे्रसमधील या गटबाजीचा आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना दोन्ही गटांशी समन्वय साधण्याची कसरत करावी लागणार आहे.
>नवी मुंबई काँग्रेसमध्ये मतभेद नाहीत, युवक अध्यक्षांना फोन केले असता कधीही फोन घेत नाहीत. निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात कधी विचारपूस करत नाहीत. कार्यक्र मांबाबत माहिती देत नाहीत व बोलावतही नाहीत.
- अनिल कौशिक, अध्यक्ष,
नवी मुंबई जिल्हा
काँगे्रस कमिटी
>मुख्य कार्यकारिणीकडून युवकच्या पदाधिकाºयांना विश्वासात घेतले जात नाही. वारंवार डावलले जात असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
- निशांत भगत,
अध्यक्ष, युवक काँगे्रस