पनवेलमध्ये वाढतोय वेश्या व्यवसाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 02:52 AM2018-08-12T02:52:03+5:302018-08-12T02:52:17+5:30
पनवेल शहरात वेश्याव्यवसाय फोफावू लागला आहे. शहरातील आंबेडकर रस्त्यापासून शिवाजी सर्कलपर्यंत वेश्या दिवसा देखील या ठिकाणी उभ्या असतात.
पनवेल - पनवेल शहरात वेश्याव्यवसाय फोफावू लागला आहे. शहरातील आंबेडकर रस्त्यापासून शिवाजी सर्कलपर्यंत वेश्या दिवसा देखील या ठिकाणी उभ्या असतात. तर कळंबोली येथील खिडूकपाडा जवळील रस्त्यावर उभ्या कंटेनरच्या मागे रात्री सर्रासपणे वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे दिसून येते.
गेल्या वर्षी आकुर्ली येथे देहविक्रेय करणाऱ्या एका महिलेची हत्या करण्यात आली होती. शहराच्या गजबजलेल्या भागांत देहविक्रेय करणाºया महिलांचा वावर वाढला आहे. बसस्थानक परिसरासह आंबेडकर रस्त्यापासून शिवाजी सर्कलपर्यंत दिवसादेखील या महिला उभ्या असतात. कळंबोली खिडूकपाडा येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असणाºया कंटेनरच्या आडून हा व्यवसाय फोफावत असल्याचे दिसून आले आहे. कळंबोली पोलिसांकडून या संदर्भात कोणतीही कारवाई होत नसल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. शहरात आठ ते दहा ठिकाणी वेश्या व्यवसायाचे अड्डे चालतात. यात बस स्थानक, रेल्वेस्थानक, शिवाजी सर्कल अशा गजबजलेल्या ठिकाणांचाही समावेश आहे. पनवेल शहरातील पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर संध्याकाळच्या वेळी अनेक महिला ग्राहकांच्या प्रतीक्षेत उभ्या असतात. त्यामुळे पोलिसांच्या हेतूवरही संशय घेतला जात आहे.
दरम्यान, अनैतिक धंद्यांची गय केली जाणार नाही. वेश्याव्यवसाय करणाºया महिलांचा बंदोबस्त केला जाईल, असे परिमंडळ २ चे पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी स्पष्ट केले आहे.