शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव - मुख्यमंत्री; व्यापा-यांच्या हिताचीही जपणूक आवश्यक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 02:20 AM2018-09-03T02:20:16+5:302018-09-03T02:21:41+5:30
शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्यामुळे शेतक-यांच्या मालाला हमीभाव व योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासंदर्भात राज्य सरकार आग्रही आहे. शेतक-यांबरोबरच व्यापा-यांच्या हिताला बाधा येऊ दिली जाणार नाही.
नवी मुंबई : शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्यामुळे शेतक-यांच्या मालाला हमीभाव व योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासंदर्भात राज्य सरकार आग्रही आहे. शेतक-यांबरोबरच व्यापा-यांच्या हिताला बाधा येऊ दिली जाणार नाही. त्यादृष्टीने लवकरच सर्वसमावेशक धोरण आखले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
श्री कुलस्वामी सहकारी पतसंस्थेच्या एपीएमसी मार्केटमधील नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर वाशी येथील सिडको एक्झिबिशन केंद्रात भव्य सभा पार पडली, त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे हे होते. बाजार समिती सक्षम करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. राष्ट्रीय बाजारपेठ ही संकल्पना बाजार समित्यांच्या पथ्यावर पडणार आहे. त्यामुळे बाजार समितीचे महत्त्व वाढणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी स्पष्ट केले.
बाजार समितीतील व्यापाºयांचे अनेक प्रश्न आहेत. माथाडींच्या समस्या आहेत. महिनाभरात
एक बैठक घेऊन हे सर्व प्रश्न मार्गी लावले जातील, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले. मराठा व
धनगर आरक्षणाबाबत राज्य
शासन पूर्णत: अनुकूल आहे.
परंतु शासनाने शासकीय नोकºयांच्या पुढे जाऊन विचार केला आहे. मराठा व इतर समाजातील तरुणांनी
राज्य शासनाच्या योजनांचा
लाभ घेऊन उच्च शिक्षण प्राप्त
करावे. नोकरी मागण्यापेक्षा
सक्षम होऊन नोकरी देणारे बनावे, असा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी दिले. पतसंस्थेचे अध्यक्ष शंकर पिंगळे यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या आर्थिक वाटचालीचा आढावा घेतला.