शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

गुजरातचा निर्णायक विजय हुकला

By admin | Published: November 17, 2016 5:37 AM

गुजरातच्या आवाक्यात आलेला विजय निसटल्याने सामना अनिर्णीत ठेवण्यात मध्यप्रदेशच्या खेळाडूंना यश आले.

नागोठणे : येथील रिलायन्सच्या मैदानावर झालेल्या गुजरात आणि मध्य प्रदेश संघामधील रणजी क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्याच्या चौथ्या दिवशी गुजरातने मध्यप्रदेश संघापुढे ३७५ धावांचे आव्हान ठेवले होते. मध्यप्रदेशचे ४ खेळाडू अवघ्या ३६ धावांवर तंबूत परतल्याने गुजरातचा विजय निश्चित समजला जात होता. मात्र, नमन ओझाच्या जोडीला सहाव्या क्रमांकावर आलेल्या हरप्रीतसिंग भाटिया या जोडीने फटकेबाजी करीत संघाच्या धावांना आकार देत खेळी करीत ११३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केल्याने गुजरातच्या आवाक्यात आलेला विजय निसटल्याने सामना अनिर्णीत ठेवण्यात मध्यप्रदेशच्या खेळाडूंना यश आले. पहिल्या डावातील आघाडीमुळे गुजरातला ३, तर मध्यप्रदेशला १ गुण मिळाला. नाबाद १३९ धावांची खेळी करणाऱ्या पार्थिव पटेलला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. गुजरातने बुधवारी सकाळी मंगळवारच्या २ बाद २२८ धावांवर खेळ चालू केला. संघाच्या गुणफलकात १७ धावांची भर टाकून २४५ धावांवर समीत गोहीलने आपला बळी दिला. त्याने या डावात १०४ धावांची शतकी खेळी केली. आणखी ४८ धावांची भर टाकून ३ फलंदाज बाद झाल्याने कर्णधार पार्थिव पटेलने ६ बाद ३२४ धावांवर संघाचा डाव घोषित करून मध्यप्रदेशच्या संघापुढे विजयासाठी ३७५ धावांचे आव्हान ठेवले होते. या डावात पटेलने बहारदार अशी नाबाद १३९ धावांची खेळी केली. मध्यप्रदेशचा जलदगती गोलंदाज ईश्वर पांडेने ४, चंद्रकांत साकुरे आणि हरप्रीतसिंग यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. मध्यप्रदेशच्या संघाने दुसरा डाव चालू केला असता ५ धावांवरच सलामीचे दोन्ही फलंदाज तंबूत धाडण्यात गुजरातच्या फलंदाजांना यश आले होते. त्यानंतर पुन्हा संघाच्या फलकावर ३६ धावा लागलेल्या असताना पुन्हा २ बळी मिळाल्याने चहापानापूर्वी गुजरातच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, नमन ओझाच्या जोडीला आलेल्या हरप्रीतसिंग भाटियाने फटकेबाजी करीत खेळ चालू ठेवल्याने चहापानानंतर १ तासाने १४९ धावांवर नमन ओझाची वैयक्तिक ५२ धावांवर विकेट पडली. शेवटच्या दीड तासात मँडेटरी ओव्हर चालू झाल्यानंतर १० षटकांमध्ये एकही विकेट न पडल्याने १० षटके शिल्लक असताना दोन्ही कर्णधारांच्या सल्ल्याने सामना थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या डावात गुजरातच्या रु श कलारियाने ४, तर बुमराह आणि फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने प्रत्येकी १ बळी घेतला. सामन्यात पंच म्हणून के. श्रीनिवासन आणि ए. पद्मनाभन, मॅच रेफ्री कर्नल संजय वर्मा, तर स्कोअरर म्हणून विश्वास घोसाळकर, मंगेश नाईक यांनी काम पाहिले. (वार्ताहर)