गुलशन रॉय यांची ‘जेएनपीटी’ला भेट

By admin | Published: June 30, 2017 01:22 AM2017-06-30T01:22:46+5:302017-06-30T01:22:46+5:30

देशातील सर्वात मोठ्या असलेल्या जेएनपीटी बंदरावर झालेल्या रॅन्समवेयर व्हायरस हल्ल्यामुळे झालेल्या दुष्परिणामाचा आढावा घेण्यासाठी

Gulshan Roy visits 'JNPT' | गुलशन रॉय यांची ‘जेएनपीटी’ला भेट

गुलशन रॉय यांची ‘जेएनपीटी’ला भेट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
उरण : देशातील सर्वात मोठ्या असलेल्या जेएनपीटी बंदरावर झालेल्या रॅन्समवेयर व्हायरस हल्ल्यामुळे झालेल्या दुष्परिणामाचा आढावा घेण्यासाठी नॅशनल सायबर सिक्युरिटीचे को-आॅर्डिनेटर डॉ. गुलशन राय यांनी जेएनपीटीला तातडीने भेट दिली. यावेळी रॅन्समवेयर ए.पी.एम. मोल्लर मर्क्सकडून चालविल्या जाणाऱ्या जीटीआय टर्मिनल बंदरावर झालेल्या सायबर हल्ल्याचे मूल्यांकनही करण्यात आले. या वेळी त्यांनी जीटीआयचे प्रशासन अधिकारी, अबकारी आणि केंद्रीय सीमा शुल्क विभागाचे मुख्य आयुक्त, महाराष्ट्र सायबर सेल विभागाचे महानिरीक्षक, तसेच खासगी डीपी वर्ल्ड आणि जेएनपीटी बंदर अधिकाऱ्यांशीही भेटीअंतर्गत चर्चा केल्याची माहिती जेएनपीटीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिली. जेएनपीटी कस्टम आणि एक्साइजचे अधिकारी सायबर सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेत असून, तशा सूचना नॅशनल सायबर सिक्युरिटीचे को- आॅर्डिनेटर डॉ. गुलशन राय यांनी संबंधितांना दिल्या आहेत.Þ

Web Title: Gulshan Roy visits 'JNPT'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.