पनवेलमध्ये तोफा थंडावल्या

By Admin | Published: May 23, 2017 02:08 AM2017-05-23T02:08:31+5:302017-05-23T02:08:31+5:30

पनवेल महानगर पालिकेच्या २० प्रभागातील ७८ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी गेल्या २० ते २५ दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होती.

The guns stopped in Panvel | पनवेलमध्ये तोफा थंडावल्या

पनवेलमध्ये तोफा थंडावल्या

googlenewsNext

मयूर तांबडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल महानगर पालिकेच्या २० प्रभागातील ७८ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी गेल्या २० ते २५ दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. त्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये कोपरा सभा, जाहीर सभा, रॅली, पदयात्रा, रोड शो, गाठीभेटीची अक्षरश: रणधुमाळी सुरू होती.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सोमवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. त्यामुळे आता छुप्या प्रचाराला सुरु वात झाली आहे. रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका असलेल्या पनवेल महापालिकेची निवडणूक बुधवार, २४ मे रोजी होत आहे. भाजपा-आरपीआय, शेकाप-काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना-स्वाभिमानी, मनसे यांच्यात ही लढत होत आहे. युती आघाडीच्या विरोधात पनवेलमध्ये मनसे स्वबळावर लढत आहे. २४ मे रोजी मतदान होणार असल्याने अखेरच्या मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांकडून धडपड सुरू झाली आहे.
मतदानासाठी अवघा एक दिवस शिल्लक असताना छुप्या प्रचारासाठी उमेदवारांचा रात्रीस खेळ चाले असा कार्यक्र म जोर धरणार आहे. महापालिका निवडणुकीचे धूमशान आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. शेकाप, राष्ट्रवादी,काँग्रेस, भाजपा, शिवसेना, रासप, भारिप, स्वाभिमानी शेतकरी संघटना यासह अपक्ष अशा सर्वच उमेदवारांनी धूमधडाक्यात प्रचार मोहीम राबवून प्रभागांमध्ये रान उठवले होते. पदयात्रा, रॅली, कोपरा सभा, जाहीर सभा, भेटीगाठी, आरोप-प्रत्यारोपाने पनवेल महापालिका हद्दीतील वातावरण ढवळून गेले होते. पनवेलमधील उमेदवारांचा प्रचार संपल्याने मतदारांना लक्ष्मी दर्शन होऊ शकते.
प्रचारसभा, पदयात्रा यामुळे पनवेलमध्ये निवडणूक फिव्हर चढला होता. घोषणाबाजी, जेवणावळी, आश्वासनांचा पाऊस, आरोप-प्रत्यारोप यामुळे वातावरण ढवळून गेले होते. सोमवारी आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. जाहीर प्रचार बंद झाला असला तरी त्यानंतरच छुप्या प्रचाराला जोर येणार आहे.


महापालिका सज्ज
१पनवेल : महापालिकेच्या निवडणुकीसाठी अवघे काही तास शिल्लक असून त्यासाठी पनवेल महानगर पालिकेसह पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. २० प्रभागात ७८ जागेसाठी ही निवडून पार पडणार आहे. निवडणुकीत ४ लाख २५ हजार ४५३ नागरिक आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मे महिना सुरू असल्याने उष्णतेचा प्रभाव लक्षात घेता राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, पनवेल महापालिका आयुक्तांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर रुग्णवाहिका उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.
२२० प्रभागातील सहाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये पालिकेच्या विविध क्षेत्रात आहेत. त्यामध्ये स्वामी नित्यानंद मार्ग, गोखले हॉल शेजारी याठिकाणी पहिल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे कार्यालय आहेत. तर जोमा म्हात्रे विद्यालय नावडे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ खारघर, कालभैरव मंदिर कार्यालय कळंबोली, रयत इंग्लिश स्कूल कामोठे, के. व्ही. कन्या विद्यालय, कोकण एज्युकेशन सोसायटीचे इंदूबाई वाजेकर विद्यालय याठिकाणी ही सहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये आहेत. मतदारांना उष्माघाताचा त्रास झाल्यास त्यांना तत्काळ आरोग्य सेवा पुरविण्याच्या दृष्टीने पालिकेचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी हा निर्णय घेतला आहे. मतदान केंद्रावर कोणतीही वैद्यकीय मदत लागल्यास टोल फ्री क्र मांक १०८ वर संपर्क साधण्याचे आवाहन राजेंद्र निंबाळकर यांनी केले आहे.

सोमवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावण्याच्या मार्गावर असताना शेकापच्या कार्यकर्त्यानी भाजप उमेदवाराची गाडीवर दगडफेक केली. यासंदर्भात खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्र ार नोंदवण्यात आली आहे.

Web Title: The guns stopped in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.