शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

भाजी, फळ मार्केटमध्ये गुटखा जप्त; पानटपरीचालकांवरही होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 2:05 AM

मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या भाजी व फळ मार्केटमधील अवैध व्यवसायाविषयी ‘लोकमत’ने आवाज उठविताच प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. दोन्ही मार्केटमधून गुटखा जप्त केला आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या भाजी व फळ मार्केटमधील अवैध व्यवसायाविषयी ‘लोकमत’ने आवाज उठविताच प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. दोन्ही मार्केटमधून गुटखा जप्त केला आहे. गुटखाविक्री करणाऱ्या पानटपरीचालकांवरही कारवाई करणार असून, अवैध व्यवसायिकांचे परवाने रद्द करणार आहेत.‘एपीएमसीमधील समस्यांचा ‘फळ’बाजार!’ याविषयी वृत्त ‘लोकमत’ने १७ एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध केले होते. कचºयाच्या समस्येबरोबर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखाविक्री केली जात असून, गांजा सेवन करणाºयांच्या मैफिली रंगत असल्याचेही पुराव्यानिधी दाखविण्यात आले होते. बाजारसमितीचे मुख्य प्रशासक सतीश सोनी यांनी या वृत्ताची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याचे आदेश भाजी व फळ मार्केटमधील उपसचिवांना व सुरक्षा विभागाला दिले होते. भाजी मार्केटमधील सुरक्षा विभागाने तत्काळ दखल घेऊन कारवाईचा धडाका सुरू केला आहे. मार्केटमधील पी-३४ या पानटपरीमधून गुटख्याच्या ४२५ पुड्या जप्त केल्या आहेत. आर-२१ या टपरीमधून २७० पुड्या जप्त केल्या आहेत. आर-३० मधून २१, पी-१५मधून १४०, २० नंबर स्टॉल्समधून २३४ पुड्या जप्त केल्या आहेत. सहाही पानटपºयांमधील माल जप्त करून पंचनामा केला आहे. कारवाईविषयी सविस्तर अहवाल मुख्य सुरक्षा अधिकाºयांमार्फत प्रशासकांकडे पाठविला आहे. फळ मार्केटमधील सुरक्षा विभागानेही चार पानटपºयांमधून गुटखा जप्त केला आहे. याविषयी अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात आला आहे.भाजी व फळ मार्केटमधील सुरक्षा अधिकारी व कर्मचाºयांनी गुटखा जप्त केला आहे; परंतु याविषयी गुन्हा दाखल करण्याचे अधिकार सुरक्षा विभागाला नाहीत. अन्न व औषध प्रशासनाच्या कर्मचाºयांनी गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. यामुळे जप्त केलेल्या गुटख्याविषयी सविस्तर अहवाल पोलीस व अन्न औषध प्रशासनाला देणार आहे. गुटखाविक्री करणाºयांचा अहवाल एपीएमसीचे मुख्य प्रशासक सतीश सोनी यांना दिला आहे. बंदी असलेल्या वस्तूंची विक्री केल्यास त्यांचा परवाना रद्द होऊ शकतो.पोलीस व एफडीएच्या कारवाईकडे लक्षगुटखाविक्री करणाºयांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा अधिकार अन्न व औषध प्रशासनाचा आहे; परंतु ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी एपीएमसीमध्ये कधीच फिरकत नाहीत. याशिवाय स्थानिक पोलीसस्टेशनकडूनही अधिकार नसल्याचे सांगून कारवाई करण्याकडे टाळले जाते. यामुळेच अवैध व्यवसाय करणाºयांचे मनोबल वाढत आहे.कारवाई सुरूच राहणार : बाजारसमिती प्रशासनाने अवैधपणे गुटखाविक्री करणाºयांवर कारवाई सुरूच ठेवली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जे स्टॉलधारक गुटखाविक्री करतील, त्यांचे परवाने रद्द करण्याची नोटीस दिली जाणार आहे. यामुळे स्टॉलधारकांचे धाबे दणाणले आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई