घारापुरी बेटावरील २५ स्थानिक लघुउद्योजकांवर उपासमारीचे संकट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 04:10 AM2019-02-06T04:10:47+5:302019-02-06T04:11:01+5:30
घारापुरी बेटावर पर्यटनावर आधारित व्यवसाय करण्यासाठी उभारण्यात आलेली गरीब-गरजूंच्या टपऱ्या, दुकाने मेरिटाइम बोर्डाने अनधिकृत ठरवल्या आहेत
उरण - घारापुरी बेटावर पर्यटनावर आधारित व्यवसाय करण्यासाठी उभारण्यात आलेली गरीब-गरजूंच्या टपऱ्या, दुकाने मेरिटाइम बोर्डाने अनधिकृत ठरवल्या आहेत आणि कारवाईच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे पर्यटनावर व्यवसाय करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणाºया जवळपास २५ स्थानिक लघुउद्योजकांवर उपासमारीचे संकट येऊ घातले आहे.
स्थानिक ग्रामस्थांना कायमस्वरूपी दुकाने भाडेतत्त्वावर सुशोभित करून देण्याची मागणी याआधीच सेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मेरिटाइम बोर्डाला दिलेल्या प्रस्तावातून केली होती. त्यानंतर मंगळवारी त्रिमूर्ती लघुउद्योजक सामाजिक संस्थेच्या पदाधिकाºयांनी मागील अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाºया स्थानिक भूमिपुत्रांना सुशोभित दुकाने जोपर्यंत दिली जात नाहीत तोपर्यंत सदर दुकानांवर कारवाई करण्यात येऊ नये, अशी विनंती रायगड जिल्हाधिकाºयांंकडे केली. जिल्हाधिकाºयांनीही याबाबत संबंधित अधिकाºयांसोबत बैठक बोलावून घारापुरी येथील दुकानदारांना न्याय मिळेल, असे आश्वासन दिले आहे.
घारापुरी बेट जागतिक कीर्तीचे पर्यटन स्थळ आहे. शेतबंदर जेट्टीपासून ते लेण्यांच्या पायथ्यापर्यंत मेरिटाइम बोर्डाच्या जागेत सुमारे ५० छोटी-मोठी दुकाने आहेत. यामध्ये चणे-फुटाणे, मका, टोप्या आदी अत्यंत गरीब-गरजू विक्रे त्या दुकानदारांचा समावेश आहे. पर्यटनावर आधारित व्यवसाय करणाºया स्थानिक व्यावसायिकांना मेरिटाइम बोर्डाने कायमस्वरूपी दुकाने सुशोभित करून भाडेतत्त्वावर देण्यात यावीत असा प्रस्ताव खासदार श्रीरंग बारणे यांनी दिला होता. या प्रस्तावाला मेरिटाइम बोर्डानेही होकार दर्शविला होता. लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर राजकीय हस्तक्षेपामुळे मेरिटाइम बोर्डाने भूमिका बदलली असून भूमिपुत्रांची दुकाने अनधिकृत ठरवली आहे.