कमलाकर कांबळे।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : लॉकडाऊनमुळे वाणिज्य वापराच्या जागांचे भाडे निम्म्यावर आले आहे. दुकानाचे भाडे देणे शक्य नसल्याने अनेकांनी आपले व्यवसाय बंद केले आहेत. त्यामुळे व्यावसायिक वापराच्या शेकडो मालमत्ता वापराविना पडून आहेत. त्यामुळे या मालमत्ताधारकांचे धाबे दणाणले असून, होणारे नुकसान कमी करण्यासाठी अनेकांनी भाडेदर निम्म्यावर आणल्याचे समजते.
देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे. लहान-मोठ्या सर्वच व्यावसायांना टाळे लागले आहेत. विशेष म्हणजे, बहुतांशी व्यवसाय भाडेतत्त्वावरील जागेवर केले जातात, परंतु मागील चार महिन्यांपासून सर्वच व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे अनेकांचे भाडे थकले आहे. धंदाच नसेल, तर भाडे कुठून देणार, असा प्रश्न या व्यावसायिकांना सतावत आहे. त्यामुळे अनेकांनी व्यवसाय बंद करून घरी बसणे पसंत केले आहे. नवी मुंबई शहरात अशा व्यावसायिकांची संख्या लक्षणीय आहे. दुकान किंवा गाळ्याच्या मासिक भाड्यातून अनेकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो, परंतु मागील चार महिन्यांपासून दुकाने बंद असल्याने भाडेही थकले आहे. त्यामुळे दुकान मालकांचेही आर्थिक गणित कोलमडले आहे. याचा परिणाम म्हणून अनेकांनी थकीत भाडेवसुलीसाठी संबंधित दुकानचालकांच्या मागे तगादा लावला आहे. काही दुकानचालकांनी स्वत:च आपले व्यवसाय बंद करून गावाकडे स्थलांतर केले आहे.
मागील चार महिन्यांत ही प्रक्रिया वेगाने वाढल्याने शहरातील अनेक दुकाने व गाळ्यांना टाळे लागले आहेत. दुकाने विनावापर बंद ठेवणे गाळे मालकांना परवडणारे नसल्याने अनेकांनी मिळेल त्या भाडेदरावर आपली दुकाने भाडेतत्त्वावर देण्याचा सपाटा लावला आहे. काही ठिकाणी तर हे भाडे चक्क निम्म्यावर आल्याचे इस्टेट एजेंट सांगतात. त्या तुलनेत निवासी जागांच्या भाडेदरात कोणताही परिणाम झाल्याचे जाणवत नाही. कारण सध्याच्या परिस्थितीत कोणीही आपली निवासी जागा बदलण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे दिसून आले आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे घरभाडेसुद्धा थकले आहे. काहींनी वसुलीसाठी भाडेकरूंच्या मागे तगादा लावला आहे, तर काहींनी मोठ्या मनाने मागील तीन महिन्यांचे भाडे माफ केल्याची उदाहरणे आहेच्दुकाने विनावापर बंद ठेवणे गाळे मालकांना परवडणारे नसल्याने अनेकांनी मिळेल त्या भाडेदरावर आपली दुकाने भाडेतत्त्वावर देण्याचा सपाटा लावला आहे. काही ठिकाणी तर हे भाडे चक्क निम्म्यावर आल्याचे इस्टेट एजेंट सांगतात.लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यावसायिकांनी आपले दुकान किंवा गाळे मालकांबरोबरचा भाडेकरार रद्द केला आहे. नवीन भाडेकरू येत नसल्याने दुकानमालकांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. काहीच नसण्यापेक्षा काहीतरी असलेले बरे, या भावनेतून अनेक जण मिळेल त्या दराने आपली दुकाने भाडेतत्त्वावर देण्यास तयार झाले आहेत. वाशीसारख्या विभागात सध्या दुकानाचे भाडे निम्म्यावर आले आहे.-मिलिंद पाटीलप्रॉपर्टी कन्सल्टंट, वाशी.