हवामानातील बदलामुळे स्ट्रॉबेरीची आवक निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 01:33 AM2018-01-17T01:33:23+5:302018-01-17T01:33:23+5:30

महाबळेश्वर, पाचगणीहून मुंबईत येणाºया स्ट्रॉबेरीची आवक घटली असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक निम्म्यावर आली आहे.

At half the strawberry arrivals due to climate change | हवामानातील बदलामुळे स्ट्रॉबेरीची आवक निम्म्यावर

हवामानातील बदलामुळे स्ट्रॉबेरीची आवक निम्म्यावर

Next

प्राची सोनवणे
नवी मुंबई : महाबळेश्वर, पाचगणीहून मुंबईत येणाºया स्ट्रॉबेरीची आवक घटली असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक निम्म्यावर आली आहे. हवामानातील बदल, वाढती उष्णता ही स्ट्रॉबेरीच्या पिकाला पोषक नसल्याने उत्पादनावर परिणाम झाल्याची माहिती एपीएमसी फळ बाजारातील व्यापाºयांनी दिली आहे. डिसेंबर महिन्याच्या तुलनेत जानेवारीत स्ट्रॉॅबेरीच्या किमती घसरल्याचेही व्यापाºयांनी सांगितले. ओखी वादळ आणि अवकाळी पावसाने स्ट्रॉबेरीच्या पिकावर परिणाम झाला होता. मात्र त्यानंतर स्ट्रॉबेरीच्या पिकासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे बाजारात आवक वाढली. नोव्हेंबर अखेरीस आणि डिसेंबर महिन्यात स्ट्रॉबेरीला मोठ्या प्रमाणात मागणी दिसून आली. मात्र जानेवारी महिन्यात हवामानात झालेला बदल, तसेच आकाराने लहान असलेल्या स्ट्रॉबेरी खरेदी केली जात नसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची माहिती व्यापारीवर्गाने दिली आहे. अर्धा किलोचा बॉक्स ६० ते १०० रुपये दराने विक्रीसाठी उपलब्ध होता. जानेवारी महिन्यात मात्र पुन्हा ही आवक निम्म्यावर आली असून दरही घसले आहेत.

Web Title: At half the strawberry arrivals due to climate change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.