घणसोलीमध्ये इमारतीवर हातोडा, पालिकेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 01:08 AM2019-01-01T01:08:31+5:302019-01-01T01:09:58+5:30
महापालिकेने एका वर्षामध्ये घणसोली कार्यक्षेत्रात ११४ जणांविरोधात रबाळे पोलिसांत एमआरटीपी कायदा कलम ५४ आणि ५३ /१ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नवी मुंबई : अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरोधात नवी मुंबई महापालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे. सोमवारी घणसोली गावात शंकरबुवा वाडी येथे एका चार मजली इमारतीच्या तिस-या आणि चौथ्या मजल्यावर महापालिकेच्या अतिक्र मण विभागाने पोलीस बंदोबस्तात हातोडा मारून कारवाई केली.
महापालिकेने एका वर्षामध्ये घणसोली कार्यक्षेत्रात ११४ जणांविरोधात रबाळे पोलिसांत एमआरटीपी कायदा कलम ५४ आणि ५३ /१ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गत तीन वर्षांत याच इमारतीवर महापालिका आणि सिडकोच्या अतिक्र मण विभागाने तीन वेळा कारवाई केली आहे. या इमारतीच्या विकासकाविरोधात यापूर्वी एमआरटीपी 54 अन्वये रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही त्यांनी पालिका किंवा सिडकोची परवानगी न घेता, तिसºया आणि चौथ्या मजल्याचे वाढीव बांधकाम सुरू ठेवले होते. अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली. सहायक आयुक्त दत्तात्रेय नागरे आणि घणसोली अतिक्रमण विभागाचे प्रमुख अधिकारी रोहित ठाकरे यांनी परिसरातील अतिक्रमणावर कारवाई करण्याचा धडाका लावला असून, अतिक्रमण करणाºयांचे धाबे दणाणले आहेत.