पनवेलमध्ये अतिक्रमणावर हातोडा
By admin | Published: April 6, 2016 04:26 AM2016-04-06T04:26:10+5:302016-04-06T04:26:10+5:30
पनवेल नगरपालिकेने मंगळवारी अतिक्रमणविरोधी मोहीम हाती घेऊन आंबेडकर रोडवरील अनधिकृत शेड आणि फलकांवर कारवाई केली.
पनवेल : पनवेल नगरपालिकेने मंगळवारी अतिक्रमणविरोधी मोहीम हाती घेऊन आंबेडकर रोडवरील अनधिकृत शेड आणि फलकांवर कारवाई केली. ही मोहीम आणखी तीव्र करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी दिली.
पनवेल शहरातील रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्याचबरोबर पदपथही काबीज करण्यात आले आहेत. व्यावसायिकांनी बेकायदेशीर शेड बांधून त्या ठिकाणी व्यवसाय थाटला असल्याने रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्र ारी येत होत्या. त्यानुसार मंगळवारपासून मुख्याधिकारी मंगेश चितळे यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकर मार्गावरील अतिक्र मणविरोधी मोहीम हाती घेण्यात आली. कामगार, पालिका कर्मचारी, दोन जेसीबीसह बेकायदा शेडवर हातोडा मारण्यात आला. त्याचबरोबर अनधिकृत फलकही काढून टाकण्यात आले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जवळपास पंधरा दिवस ही मोहीम सुरू राहणार असून सगळे मुख्य रस्ते अतिक्र मणमुक्त करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)