एसटीच्या इमारतीवर हातोडा

By admin | Published: June 8, 2015 11:06 PM2015-06-08T23:06:41+5:302015-06-08T23:06:41+5:30

पनवेल बसस्थानकातील धोकादायक इमारतीमुळे कोणतीही जीवित व वित्तहानी होऊ नये, म्हणून एसटी महामंडळाने ही इमारत पाडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चार बसस्थानकांचा भार दोन स्थानकांवर येणार आहे.

Hammer on ST building | एसटीच्या इमारतीवर हातोडा

एसटीच्या इमारतीवर हातोडा

Next

पनवेल : पनवेल बसस्थानकातील धोकादायक इमारतीमुळे कोणतीही जीवित व वित्तहानी होऊ नये, म्हणून एसटी महामंडळाने ही इमारत पाडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चार बसस्थानकांचा भार दोन स्थानकांवर येणार आहे.
कायम वर्दळीचे आणि गजबजलेले स्थानक म्हणून पनवेल बसस्थानकाची ओळख आहे. मात्र स्थानकाच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचे दिसते. बसस्थानकातील अंतर्गत रस्ते खड्ड्यात गेले असून येथे कचऱ्याचे साम्राज्य असल्याने दुर्गंधी पसरली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली बसस्थानकाच्या सुशोभीकरणाची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. पनवेल नगरपालिकेने पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या धोक्यांचा विचार करून शहरातील धोकादायक इमारतीची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये स्थानक क्र मांक १ आणि २ इमारतींचा समावेश आहे. प्रशासनाने पाऊस सुरू होण्याच्या आधी ही इमारत जमीनदोस्त करण्याच्या सूचना एसटी प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार इमारत पाडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. (वार्ताहर)

Web Title: Hammer on ST building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.