घणसोलीत दोन इमारतींवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 11:18 PM2019-12-17T23:18:28+5:302019-12-17T23:19:57+5:30

चोख पोलीस बंदोबस्त : महापालिका, सिडकोची संयुक्त कारवाई

Hammer on two buildings in Ghanoli | घणसोलीत दोन इमारतींवर हातोडा

घणसोलीत दोन इमारतींवर हातोडा

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : परवानगी न घेता अनधिकृतपणे घणसोली येथे बांधकाम सुरू असलेल्या दोन आरसीसी इमारतींवर सिडको आणि महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने मंगळवारी संयुक्त कारवाई करून बांधकाम निष्कासित केले.
घणसोली गावातील अर्जुनवाडी परिसरात सोमवारी महापालिकेच्या विभागाने कारवाई केली होती. या कारवाईला २४ तास उलटूनही गेले नाही तोच मंगळवारी सिडको आणि महापालिकेने पोलीस बंदोबस्तात येथील बिल्डर विजय अहिरे आणि कैलास प्रधान यांच्यासह अन्य एका इमारतींवर कारवाई केली. सिडको आणि महापालिकेने वारंवार सूचना देऊनही बांधकाम सुरूच ठेवल्याने ही कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ आणि सिडकोचे अतिक्रमण विभागाचे मुख्य नियंत्रक किशन जावळे यांच्या आदेशानुसार महापालिका उपायुक्त अमरिश पटनिगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या प्रभारी नियंत्रक सुमन कोळगे, सहायक नियंत्रक अमोल देशमुख, महापालिकेच्या वतीने घणसोली विभागाचे सहायक आयुक्त महेंद्रसिंग ठोके आणि कोपरखैरणे विभागाचे सहायक आयुक्त अशोक मढवी यांनी ही धडक कारवाई केली. कारवाईसाठी ४५ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, १५ लेबर, ९ कॉम्प्रेसर, ब्रेकर मशिनरी, १२ सुरक्षारक्षक, दोन ट्रक असा फौजफाटा होता.

घणसोली, तळवली, गोठीवली आणि रबाळे परिसरात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट सुरू आहे. महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या कारवाईमुळे अनधिकृतपणे बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title: Hammer on two buildings in Ghanoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.