शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

मुक्या जीवांसाठी सरसावले हात

By admin | Published: March 26, 2016 2:26 AM

पशुपक्ष्यांच्या राहण्याची जागा मनुष्याने बळकावल्याने पशुप्राण्यांना हक्काचा निवारा मिळत नाही. वाशीतील भूमी जीवदया संवर्धन ट्रस्टच्या वतीने पशुपक्ष्यांच्या मायेचा आधार देऊन

नवी मुंबई : पशुपक्ष्यांच्या राहण्याची जागा मनुष्याने बळकावल्याने पशुप्राण्यांना हक्काचा निवारा मिळत नाही. वाशीतील भूमी जीवदया संवर्धन ट्रस्टच्या वतीने पशुपक्ष्यांच्या मायेचा आधार देऊन त्यांचावर मोफत उपचार केले जातात. वर्षभरात या संस्थेच्या वतीने पाच हजारांहून अधिक पशुपक्ष्यांचे प्राण वाचविले असून, त्यांना हक्काचा निवारा मिळवून दिला आहे. जखमी पक्षी, प्राणी आढळल्यास या संस्थेचे स्वयंसेवक त्या ठिकाणी जाऊन मोफत उपचार करतात. वाढते शहरीकरण, त्याबरोबरीने वाढणारे प्रदूषण, झाडांची कत्तल करून उभारल्या जाणाऱ्या टोलेजंग इमारती अशा अनेक कारणांमुळे प्राण्यांचा बळी जाण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. वाशी परिसरात राहणारा सागर सावला या तरुणाने पशुंच्या रक्षणासाठी भूमी जीवदया ही संकल्पना सर्वांसमोर उभी केली आणि आज याच संस्थेमार्फत हजारो मुक्या जीवांना नवीने आयुष्य देण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते राघवजी वाघजी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली जुलै २०१४ साली भूमी जीवदया संवर्धन संस्थेची स्थापना करण्यात आली. सरपटणारे प्राणी, गाय, बैल, म्हैस तसेच विविध प्रकारच्या पक्ष्यांवर उपचार करून त्यांचे प्राण वाचविण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)नवी मुंबई शहरात पशू वैद्यकीय रुग्णालय नसल्याने या ठिकाणी एक सर्व सोयीसुविधांयुक्त रुग्णालय उभारण्याची आवश्यकता असून, भूमी जीवदया संवर्धन ट्रस्टच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. नुकताच या संस्थेच्या वतीने रुग्णवाहिकेचा शुभारंभ केला असून, मुक्या जीवांच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस ही सेवा कार्यरत राहणार असल्याची माहिती सागर सावला यांनी दिली. दुखापत झालेल्या प्राण्यांना आमच्या केंद्रापर्यंत आणण्यास या रुग्णवाहिकेचा वापर केला जाणार आहे.