उरण : जेएनपीटीने कार्गो हॅण्डलिंगमधील प्रभावी कामगिरी कायम ठेवली आहे. पोर्टने सन २०१९ या वर्षात ५१ लाख कंटेनर मालाचीयशस्वीपणे हाताळणी के ली आहे. अशाप्रकारे जेएनपीटी भारतातील सर्वाधिक व्यस्त पोर्ट बनले असल्याची माहिती अध्यक्ष संजय सेठी यांनी दिली.जेएनपीटीकडे पाच कंटेनर टर्मिनल्स असून, त्यापैकी मुंबई येथील एपीएम टर्मिनलने (जीटीआय) वर्षभरात दोन दशलक्ष टीईयू इतक्या कंटेनर मालाची हाताळणी केली आहे. त्यापाठोपाठ डीपी वर्ल्ड एनएसआयजीटीने ०.९९ दशलक्ष टीईयू आणि पीएसए बीएमसीटीने ०.८२ दशलक्ष टीईयू हाताळले आहेत. जेएनपीटीने ०.७७ दशलक्ष आणि डीपी वर्ल्ड एनएसआयसीने वर्षभरात ०.५२ टीईयू इतक्या कंटेनर मालाची हाताळणी केली असल्याची माहिती जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनी दिली. या उत्कृष्ट कार्यपद्धतीबरोबरच जेएनपीटीने सातत्याने व्यवसायांमध्ये सुसूत्रता आणि सुलभता आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यासाठी जेएनपीटीने नवीन इंटर टर्मिनल रेल हॅण्डलिंग आॅपरेशन म्हणजेच आयटीआरएचओ कराराची सुरुवात केली आहे. हा करार जेएनपोर्टच्या सर्व टर्मिनल्सना लागू आहे. नवीन आयटीआरएचओ करार सर्व टर्मिनल्सनी स्वाक्षरीबद्ध आणि मान्य केला आहे. यामध्ये जेएनपीटी, एनएसआयटी, एनएसआयजीटी, जीटीआय आणि बीएमसीटीपीएल यांचा समावेश आहे.२९ जुलै २०१९ रोजी अस्तित्वात आलेल्या या कराराची अंमलबजावणी १ आॅगस्ट २०१९ पासून झाली. त्याच्यामुळे अधिकाधिक ट्रेन प्लेसमेंट, उत्पादकता मोजणे, कार्यक्षमता, बचत प्रभावी हाताळणी, आयसीडी बॉक्सेस इम्पोर्ट करण्यामधील वेळेमध्ये कपात, आयसीडी बॉक्सेस नियोजित वेळेत संबंधित टर्मिनलला एक्सपोर्ट करणे आणि जेएनपीटीमध्ये रेल्वेबरोबर भागीदारी वाढवणे हे आहे.२०१८ ते २०१९ या वर्षात रेल्वेची भागीदारीत १४.६६ टक्के वरून १६.२२ टक्के इतकी वाढ झाली आहे. रस्त्याद्वारे कंटेनर इम्पोर्ट करण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यात यश आले आहे.यावर्षी जेएनपीटीने डीपी वर्ल्ड, एपीएम टर्मिनल्स आणि पीएसए टर्मिनल्स या खासगी टर्मिनलसोबत लुधियानामध्ये ट्रेड कालावधीत कॉनकरच्या समन्वयातून प्रत्येक आठवड्याला लुधियाना ते जेएन पोर्ट या मार्गावर खास ट्रेन प्रत्येक शनिवारी सुरू करण्यात आली आहे.>आम्ही केलेले प्रयत्न आणि गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करत असल्यामुळेच आम्हाला यश मिळत आहे. आम्हाला विश्वास वाटतो की, आगामी आर्थिक वर्षातही जेएनपीटीची प्रभावी कामगिरी कायम राहील. देशातील व्यवसायाला चालना देण्याच्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत. जेएनपीटी भविष्यात नाविक क्षेत्रातील वाढती मागणी आणि जागतिक कल लक्षात घेऊन आपले कार्यप्रदर्शन सुधारण्याचा प्रयत्न करीत राहील.- संजय सेठी,चेअरमन, जेएनपीटी
जेएनपीटी बंदरातून वर्षभरात ५१ लाख कंटेनर मालाची हाताळणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 11:46 PM