- अनंत पाटीलनवी मुंबई : वीज महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे विजेच्या लपंडावाचा वाढत्या प्रकाराने घणसोली परिसरातील पाच गावातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. खांबावरील अनेक केबल्स चालताना डोक्यावरून लोंबकळत असून, पावसामुळे रस्त्यावरील उघड्या केबल्समुळे धक्का लागून शॉक लागण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून येथून येणाºया-जाणाºया पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे.घणसोली गावठाणात भूमिगत करण्यात आलेल्या अनेक केबल्स जमिनीवरून लोंबकळत आहेत. रस्त्याने चालताना विजेच्या केबल्स डोक्यावरून लोंबकळत असूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. तळवली गावात भूमिगत करण्यात आलेल्या काही घरगुती वीजपुरवठा करणाºया केबल्स खांबावरच जैसे थे असल्यामुळे सापाप्रमाणे या केबल्सचा आजूबाजूच्या घरांना विळखा घातल्याचे चित्र पाहावयास मिळते, तर नोसिल नाका झोपडपट्टी परिसरात अनेक घरांसमोर तारा लोंबकळत असून काही ठिकाणी या तारांचे जॉइंट मारले असून, त्याला सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचे आवरण नसल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. विजेच्या दररोजच्या लपंडावामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यातच गेल्या दोन महिन्यांपासून सतत रात्री अपरात्री अधूनमधून बत्ती गुल होत असल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले.घणसोली परिसरातील पाच गावांमध्ये वीजपुरवठा भूमिगत केबल्समधून केला जात असल्या, तरी अनेक ठिकाणी खांबावरील केबल्सचे जाळे जैसे थे असल्यामुळे वादळी वारा पावसामुळे केबल्स जमिनीवर पडून अपघाताची शक्यता टाळता येत नाही. अनेक ठिकाणी केबल्स गटारातून गेल्याने साफसफाई कामगारांना गटारातील कचरा, तसेच माती, घाण काढणे खूप कठीण जात आहे.घणसोली परिसरात विजेच्या संदर्भात जुन्या केबल्स किवा उघड्या डीपी बॉक्सची समस्या असल्यास त्या पावसाळ्यानंतर पाहणी करून टप्प्याटप्प्याने सोडविण्यात येतील.- दीपक शिंदे,प्रभारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता, ऐरोलीघणसोली परिसरात विजेच्या संदर्भात जुन्या केबल्स किवा उघड्या डीपी बॉक्सची समस्या असल्यास त्या पावसाळ्यानंतर पाहणी करून टप्प्याटप्प्याने सोडविण्यात येतील.- दीपक शिंदे,प्रभारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता, ऐरोलीवीज महावितरणच्या अनेक डीपी बॉक्स उघडे आहेत. सध्या लॉकडाऊन शिथिल झाले असले, तरी शाळा महाविद्यालये, तसेच काही खासगी कार्यालये किंवा कंपन्या सुरू करण्यात न आल्यामुळे घरीच बसून संगणकावर काम करावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तर नोकरदार आणि व्यावसायिकांचे आर्थिकदृष्ट्या नुकसान होत असल्याची तक्रार आहे. विजेच्या वाढत्या समस्येमुळे घरगुती पाण्याचे मोटार पंप बंद असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी अतोनात हाल होत आहेत. हा वीज महावितरण कंपनीचा खेळखंडोबा त्वरित न थांबल्यास ग्रामस्थ महावितरणच्या ऐरोली कार्यालयाला धडक देतील, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.
लोंबकळणाऱ्या तारांची टांगती तलवार, घणसोली परिसरातील पाच गावांत समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2020 1:07 AM