रेवदंडा येथील मारूती आळीतील ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना बुधवारी (२५ जानेवारी) पद्मश्री पुरस्कार जाहीर होताच जल्लोष व्यक्त करण्यात आला. सुमारे ५० वर्षे निरूपणाच्या माध्यमातून डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी अंधश्रद्धा निर्मूलन, मानवाला मानव म्हणून वागणूक देण्याची शिकवण, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिरे, पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवड असे अनेक सामाजिक कार्य त्यांच्याकडून नि:स्वार्थ भावनेने चालू आहे. अशा कार्याचा हा गौरव झाला असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. याप्रसंगी त्यांच्या निवासस्थानी धर्माधिकारी कुटुंबीय व श्री सदस्यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांना अनेकांनी दूरध्वनीवरून शुभेच्छांचा वर्षाव केला. अनेकांनी प्रत्यक्ष त्यांच्या निवासस्थानी येऊन शुभेच्छा देणे चालू होते.
आप्पासाहेबांना पुरस्कार जाहीर होणे हे त्यांच्या कामाची पोच पावती आहे. सामाजिक कार्याची सरकारने दखल घेतली त्याबद्दल सरकारचे आभार.-अनंत गीते, केंद्रीयमंत्रीनिरु पणाच्या माध्यमातून आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी व्यसनमुक्ती, स्वच्छतादूत, पर्यावरण रक्षणाचे केलेले कार्य गौरवास्पद आहे. नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून घेतलेला वसा आप्पासाहेबांनी सुरु ठेवला आहे. त्यांना मिळालेला सन्मान हा रायगडकरांसाठी अभिमानास्पद आणि गौरवास्पद आहे.- आमदार सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसआप्पासाहेबांना मिळालेला सन्मान हा रायगडकरांना अभिमानास्पद आहे. नानासाहेब धर्माधिकारी यांनी सुरु केलेल्या व्यसनमुक्तीच्या चळवळीला आप्पासाहेबांनी मूर्त रु प दिले आहे. सरकारने त्यांना पुरस्कार जाहीर केल्याबद्दल सरकारचे धन्यवाद.- आमदार जयंत पाटील, सरचिटणीस, शेकापश्रीसदस्यांसह अखंड देशासाठी हा आनंदाचा क्षण आहे. पद्मश्री पुरस्कार अनेकांना मिळाला आहे. परंतु आप्पासाहेबांना पुरस्कार जाहीर झाल्याने पुरस्काराची उंची वाढली आहे. सरकारने उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला आहे. - आमदार सुरेश लाडअध्यात्माच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांची खऱ्या अर्थाने आज समाजाला गरज आहे. आप्पासाहेबांचे कार्याची दखल सरकारने घेत त्यांना पुरस्कार जाहीर करून त्यांनी पुरस्काराची उंची वाढवली आहे.- आमदार धैर्यशील पाटीलपर्यावरण, स्वच्छता, व्यसनमुक्ती अशा विविध क्षेत्रात अध्यात्माच्या माध्यमातून आप्पासाहेबांनी केलेल्या कार्याची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. आप्पासाहेबांना पुरस्कार जाहीर केल्याने त्या पुरस्काराची उंची वाढली आहे. - आमदार सुभाष पाटीलआप्पासाहेबांना पुरस्कार जाहीर केल्याने त्या पुरस्काराची उंची वाढली आहे. आप्पासाहेबांनी समाजातील घटकांना सुसंस्काराची, निरामय निरोगी आयुष्याची दिशा दाखवली आहे. त्यांच्या कार्याची दखल सरकारने घेतली त्याबद्दल आभार.- आमदार प्रशांत ठाकूर