अवकाळी पावसाचा हापूसला फटका; आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 04:13 PM2023-05-06T16:13:39+5:302023-05-06T16:13:50+5:30
ग्राहकांनी देखील आंबा खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यातच हंगामातच हापूसची आवक 20 टक्क्यांवर आल्याने दर हे चढते आहे.
अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानाचा फटका हा हापूस आंब्यावर झाला आहे. शेतीसोबतच आंब्याचे देखील मोठं नुकसान झाले आहे. त्यामुळे आंब्याची आवक हि कमी झाली असून दर हे प्रचंड वाढले आहेत. एप्रिल आणि मे हा हापूस आंब्याचा वाढता हंगाम आहे. मात्र , ऐन हंगामातच उत्पादन कमी होत असल्याने व्यावसायिकांना याचा फटका बसत आहे.
ग्राहकांनी देखील आंबा खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यातच हंगामातच हापूसची आवक 20 टक्क्यांवर आल्याने दर हे चढते आहे. त्यामुळे यंदा हापूसचे दर हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. सध्या हापूसचे दर हे 600 ते 1200 पर्यंत आहेत. तर कर्नाटकी आंबे हे 170 ते 200 रुपये किलोने विकले जात आहेत. महागाईमुळे ग्राहकांनी पाठ फिरवली असल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे.