उन्हाळी सुट्टीत करा कोकणात धमालमस्ती, कोकण रेल्वे सोडणार चार विशेष गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2023 11:01 AM2023-04-02T11:01:58+5:302023-04-02T11:02:25+5:30

सुट्ट्यांनिमित्त होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन निर्णय

Have fun in Konkan during summer vacation, Konkan Railway will leave four special trains | उन्हाळी सुट्टीत करा कोकणात धमालमस्ती, कोकण रेल्वे सोडणार चार विशेष गाड्या

उन्हाळी सुट्टीत करा कोकणात धमालमस्ती, कोकण रेल्वे सोडणार चार विशेष गाड्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: उन्हाळी सुट्ट्यांनिमित्त होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या समन्वयाने हा निर्णय घेण्यात आल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे. या विशेष गाड्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे ते सावंतवाडी (गाडी क्रमांक ०१२११ /०१२१२)  ही  साप्ताहिक विशेष गाडी पुणे येथून २ एप्रिल ते ४ जून या दरम्यान प्रत्येक रविवारी धावणार आहे. ही गाडी पुणे स्थानकातून रात्री ९.३० वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता सावंतवाडीला पोहोचेल. त्याचप्रमाणे सावंतवाडी रोड- पनवेल- सावंतवाडी ही गाडी (क्रमांक ०१२१६/०१२१५) आठवड्यातून एकदा ३ एप्रिल ते ५ जून या कालावधीत दर सोमवारी धावेल. ही गाडी सावंतवाडी येथून सकाळी १० वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी पनवेलला रात्री ८.३० वाजता पोहोचेल.

तिसरी समर स्पेशल गाडी (०१२१३/०१२१४) ३ एप्रिल ते ५ जून या कालावधीत धावेल. ही गाडी पनवेल येथून दर सोमवारी  रात्री ९.३० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता करमाळीला पोहोचेल.  लोकमान्य टिळक टर्मिनस ते कन्याकुमारी  ही चौथी गाडी ६ एप्रिल ते १ जून  या कालावधीत दर मंगळवारी  सायंकाळी ४ वाजता  एलटीटीवरून सुटेल व दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजून २० मिनिटांनी ती कन्याकुमारीला पोहोचेल.

Web Title: Have fun in Konkan during summer vacation, Konkan Railway will leave four special trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.