होळीला पुरणपोळीसह आमरसही ओरपा; ४९ हजार पेट्यांची आवक, हापूसचे दर नियंत्रणात

By नामदेव मोरे | Published: March 19, 2024 11:52 AM2024-03-19T11:52:10+5:302024-03-19T11:53:00+5:30

दरवर्षी गुढीपाडव्यापासून आंब्याची आवक वाढते पण यंदा होळीलाच मार्केट आंबामय होणार असल्याचे स्पष्ट

Have Puranpoli and Mango Juice together this Holi as Inflow of 49 thousand boxes and prices of alphonso under control | होळीला पुरणपोळीसह आमरसही ओरपा; ४९ हजार पेट्यांची आवक, हापूसचे दर नियंत्रणात

होळीला पुरणपोळीसह आमरसही ओरपा; ४९ हजार पेट्यांची आवक, हापूसचे दर नियंत्रणात

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी ४९ हजार पेट्यांची आवक झाली आहे. होलसेल मार्केटमध्ये हापूस ३०० ते १ हजार रुपये डझन व किरकोळ मार्केटमध्ये ७०० ते १,८०० रुपये डझन दराने विकला जात आहे. यापुढे ही आवक वाढतच राहणार असल्यामुळे होळीला मुंबईकरांना मुबलक प्रमाणात आंब्याची चव चाखता येणार आहे.

प्रत्येक वर्षी गुढीपाडव्यापासून आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत असते. परंतु, या वर्षी होळीलाच मार्केट आंबामय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. किरकोळ मार्केटमध्ये ७०० ते १,८०० रुपये डझन दराने आंब्याची विक्री होत असली तरी यापुढे हे दरही कमी होण्यास सुरुवात होणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगडसह कर्नाटक, केरळ व आंध्र प्रदेशमधूनही आंब्याची आवक सुरू झाली आहे.

  • बाजार समितीमध्ये कोकणातून ३९ हजार ४२४ व इतर राज्यांतून ९,५७६ पेट्या अशी ४९ हजार पेट्यांची आवक झाली. आठवड्यापूर्वी आंबा ४०० ते १,१०० रुपये डझन दराने विकला जात होता.
  • हा दर १०० रुपयांनी घसरून ३०० ते हजारांवर आला. २० एप्रिलपर्यंत आवक वाढतच राहणार आहे. त्यामुळे  होळीच्या सणाला पोळीसोबत आमरसाचा आनंद यंदा खवैय्यांना घेता येणार आहे.


यावर्षी मार्च ते २० एप्रिलदरम्यान आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होणार आहे. आंब्याचे दर नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली आहे. हापूसही सामान्यांच्या आवाक्यात येणार असून, होळीला अनेकांना हापूसची चव चाखता येणार आहे. मे महिन्यामध्येही आंब्याची आवक चांगली होईल. हापूसबरोबर इतर राज्यांतील आंब्याची आवकही वाढण्यास सुरुवात झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
- संजय पानसरे, संचालक, बाजार समिती

Web Title: Have Puranpoli and Mango Juice together this Holi as Inflow of 49 thousand boxes and prices of alphonso under control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.