शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

बेवारस वाहनांची डोकेदुखी, वाहतुकीला अडथळा, कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 4:00 AM

पनवेल परिसरात मुख्य व अंतर्गत रस्त्याच्या कडेला गेली अनेक वर्षे शेकडो बेवारस वाहने उभी आहेत. या वाहनांचा वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रुग्णवाहिका, स्कूलबसेस व अग्निशमन दलाच्या वाहनांना मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे.

- मयूर तांबडेपनवेल : पनवेल परिसरात मुख्य व अंतर्गत रस्त्याच्या कडेला गेली अनेक वर्षे शेकडो बेवारस वाहने उभी आहेत. या वाहनांचा वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रुग्णवाहिका, स्कूलबसेस व अग्निशमन दलाच्या वाहनांना मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या बेवारस वाहनांचा बंदोबस्त करण्याची मागणी पनवेलकरांकडून करण्यात येत आहे.सध्या शहरात वाहतूककोंडी आणि पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. शहरी व ग्रामीण अशा दोन भागांत सामावलेल्या या शहरात वाहनतळाचे नियोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे जागा मिळेल तेथे वाहने उभी केली जात आहेत. विशेष म्हणजे, वाढत्या शहरीकरणाबरोबर येथे वाहनांची संख्याही वाढत आहे. दुचाकी वाहनांचे यात प्रमाण मोठे आहे. बहुतांशी सोसायट्यांत पार्किंगसाठी जागा नसल्याने दुचाकीसह चारचाकी वाहने सर्रासपणे रस्त्यावर पार्क केली जातात. रस्त्यांच्या दुतर्फा पार्क केलेल्या या वाहनांत बेवारस वाहनांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून आले आहे. अनेक ठिकाणी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला वर्षानुवर्षे पडून आहेत. या वाहनांचा गैरवापर समाजकंटकांकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वाहनांवर वाहतूक पोलीस, महापालिकेने तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे. मात्र, कारवाई तर दूरच, या वाहनांकडे ढुंकूनही पाहिले जात नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या वाहनांमुळे रस्त्यावरील इतर वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. शहराच्या प्रत्येक भागात रस्त्याच्या बाजूला भंगार वाहने दिसून येत आहेत. प्रशासनाने दखल घेऊन वाहने लवकरात लवकर हलवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.पनवेल परिसरात हजारोंच्या संख्येने गॅरेजेस असून, तेथेही मोठ्या संख्येने नादुरु स्त वाहने उभी आहेत. नादुरु स्त वाहनांचे सुटे भाग अन्य वाहनात वापरण्यासाठी गॅरेजमालक त्यांची खरेदी करतात; परंतु सुटा भाग वापरला तरी ही वाहने वर्षांनुवर्षे गॅरेजमधील जागा अडवून बसतात. शहरातील काही रस्त्यांवर कोणत्याही कारवाईची भीती न बाळगता, सर्रासपणे नादुरु स्त, अपघातग्रस्त वाहने उभी करण्यात आली आहेत. या प्रकारामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होऊन रस्तेही मर्यादित झाले आहेत, तसेच शहराच्या विद्रूपीकरणातही भर पडत आहे. या बेवारस वाहनांचा दैनंदिन स्वच्छतेला अडथळा निर्माण होत आहे.यासंदर्भात ठोस कार्यवाही करण्याची मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे.- रस्त्यावर उभ्या असलेल्या बेवारस वाहनांवर कारवाई करण्यात येईल, असे पनवेल महापालिकेने २८ जानेवारी २०१८ रोजी जाहीर केले होते; परंतु अडीच महिने उलटून गेले, तरी यासंदर्भात कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.पनवेल वाहतूक शाखा व आरटीओला या वाहनांवर कारवाई करण्यासाठी मागच्या आठवड्यात कळवले आहे. जसजशी यादी आली, तसतशी ती त्यांना कळविण्यात आली आहे.- जमीर लेंगरेकर, उपायुक्त, पनवेल महापालिका

टॅग्स :panvelपनवेल