पनवेल महापालिकेसंदर्भात १६ जुलैला सुनावणी
By admin | Published: July 10, 2016 04:30 AM2016-07-10T04:30:59+5:302016-07-10T04:30:59+5:30
नियोजित पनवेल महापालिका स्थापनेसाठी हालचालींना वेग आला असून, यासंदर्भात जनसुनावणीची तारीख १६ जुलै ही निश्चित करण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिकेसंदर्भात सूचना व हरकती
पनवेल : नियोजित पनवेल महापालिका स्थापनेसाठी हालचालींना वेग आला असून, यासंदर्भात जनसुनावणीची तारीख १६ जुलै ही निश्चित करण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिकेसंदर्भात सूचना व हरकती रायगड जिल्हाधिकाऱ्यांना पाठवल्यानंतर जून महिनाअखेरपर्यंत या हरकतींवर सुनावणी होईल, अशी चर्चा सुरू होती. मात्र या सर्व प्रक्रि येला काही प्रमाणात उशीर झाल्याने आणि पनवेल नगर परिषदेची नव्याने प्रभागरचना झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अखेर जनसुनावणीची तारीख निश्चित झाल्याने महानगरपालिकेच्या स्थापनेला गती प्राप्त होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विभागीय आयुक्त कोक ण विभाग यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे.
पनवेल महानगरपालिकेसंदर्भात एकूण ३,९३५ हरकती व सूचनांचा समावेश होता. यामध्ये २,४४५ सूचना आणि १,४९० हरकती होत्या. खारघर शहरामधील काही संघटना व राजकीय पक्षांनी पनवेल महानगरपालिकेमध्ये समाविष्ठ होण्यास विरोध दर्शविला होता. त्यानुसार सर्वात जास्त २,९५५ हरकती व सूचना खारघरमधील रायगड जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या होत्या. त्याच्यावर सुनावणी १६ रोजी कोकण भवन येथे होणार आहे. पनवेल महानगरपालिकेत शहर आणि वसाहती, सिडको क्षेत्रातील २१ गावे, नवी मुंबई विमानतळ प्रभाग अधिसूचित (नैना ) क्षेत्रातील ३६ गावे, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण (एमएमआरडीए) क्षेत्रातील ११ गावांचा समावेश केला जाईल. शहर आणि ६८ गावे एकित्रत करून महापालिकेची स्थापना केली जाणार आहे .
पुढीलप्रमाणे होणार सुनावणी
- सकाळी ११ ते दुपारी १ - सिडको व खारघर
- दुपारी २ ते ३ - पनवेल व तळोजा
-दुपारी ३ ते ४ - कळबोली, सांगडे, बोर्ले, सीवूड, वावंजे, आसूडगाव , पेंधर
-दुपारी ४.३० ते ५.३० - सुकापूर, कोन, खैरणे, नितळस, घोटकँप (कोयनावळे), कामोठे, केवाळे, वाकडी, पालेखुर्द, कोळखे, हरिग्राम, रोडपाली, मुंबई, गिरवले, बेलापूर, नेरूळ, खोपोली, चिपळे, नाशिक, दापोली, तरघर, उलवे, कुंडेवहाळ, बाम्हण डोगरी, विचुंबे, आदई, कोल्हिकोपर, वडघर, चिखले