बीडच्या तरुणावर हृदय पुनर्रोपण शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 12:18 AM2020-02-25T00:18:50+5:302020-02-25T00:18:53+5:30

संजीव जाधव यांची माहिती; नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार

Heart transplantation surgery on the young of the bead | बीडच्या तरुणावर हृदय पुनर्रोपण शस्त्रक्रिया

बीडच्या तरुणावर हृदय पुनर्रोपण शस्त्रक्रिया

Next

ठाणे : बीड येथे राहणाऱ्या संतोष कानडे या ३६ वर्षीय रुग्णावर अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई येथे नुकतीच यशस्वी हृदय पुनर्रोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी एका दानशुराचे हृदय घेण्यात आले होते.

संतोष यांना झालेल्या आजारामुळे त्यांच्या हृदयाची ब्लड पम्पिंगची क्षमता कमी होते. त्यामुळे हृदयाचे मुख्य पम्पिंग चेंबर असणारी डावी झडप आकाराने वाढून कमकुवत होते. या क्लिनिकल संज्ञेला डायलेटेड कार्डिओमॅपॅथी (डीसीएम) असे म्हणतात. दोन लहान मुलांचा पिता असलेल्या या रुग्णाच्या आजाराचे नेमके निदान होण्यापूर्वी त्यांना गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून दम लागून पायºया चढताना त्रास होता. वारंवार हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसत नव्हती. अखेर त्यांना अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई येथील क्लिनिकमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला.

या केसमध्ये मुख्य तज्ज्ञ असणारे, हॉस्पिटलचे सीव्हीटीएस व हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी कन्सल्टंट डॉ. संजीव जाधव म्हणाले, ‘‘डायलेटेड कार्डिओमॅपॅथी हे कार्डिओमॅपॅथीचे सर्रास आढळणारे स्वरूप आहे. या विशिष्ट रुग्णाच्या बाबतीत, हृदय केवळ १७ टक्के काम करीत होते आणि त्याला तातडीने हृदय पुनर्रोपण शस्त्रक्रियेची आवश्यकता होती. रुग्णासारखाच रक्तगट असणारी ४१ वर्षीय महिला डोनर होती. तिला रस्त्यावरील अपघातामध्ये ब्रेन-डेड (कॅडव्हर डोनर) जाहीर करण्यात आले. ही हृदय पुनर्रोपण शस्त्रक्रिया ६० मिनिटांमध्ये पूर्ण करण्यात आली. त्यानंतर रुग्णाला आयसीयूमध्ये हलवण्यात आले. आता रुग्णाची प्रकृती स्थिर असून तो लवकरच पूर्णपणे बरा होईल, अशी अपेक्षा आहे.’’

ही हृदय पुनर्रोपण शस्त्रक्रिया डॉ. संजीव जाधव यांनी केली. सीव्हीटीएस सर्जन डॉ. शांतेश कौशिक, क्रिटिकल केअरचे डॉ. गुणाधार पाधी, क्रिटिकल केअरचे डॉ. अकलेश तांडेकर, डॉ. हरिदास, डॉ. सौरभ, डॉ. सनगर, अ‍ॅनेस्थेशिया आणि कार्डिआॅलॉजिस्ट डॉ. तमीरुद्दीन धनावडे या स्पेशालिस्ट टीमने त्यांना मदत केली.
(वाणिज्य प्रतिनिधी)

हृदय पुनर्रोपण शस्त्रक्रिया ज्यांच्यावर करण्यात आली ते संतोष कानडे म्हणाले, ‘‘माझे हृदय निकामी झाल्यामुळे जीवनाशी संघर्ष करून मी प्रतीक्षा करीत होतो. मला नवीन जीवनदान दिल्याबद्दल मी आॅर्गन डोनर कुटुंबाचा व ट्रान्सप्लांट करणाºया टीमचा आभारी आहे.’’

Web Title: Heart transplantation surgery on the young of the bead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.