लोकमत न्युज नेटवर्क, वैभव गायकर,पनवेल: शनिवारी मध्यरात्री पासुन पनवेल परिसरात मुसळधार पावसाने ग्रामीण भागासह शहरी भागात ठिकठिकाणी पाणी साचल्याने पहावयास मिळाले. काही तासातच १०० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे.
ग्रामीण भागासह पनवेल शहर,कळंबोली आदींसह पालिका क्षेत्रात सखल भागात पाणी साचल्याने पहावयास मिळाले.विशेष म्हणजे पावसाची संततधार कायम असल्याने साचलेले पाणी ओसरण्यास उशीर लागत असल्याचे पहावयास मिळाले.तालुक्यातील गाढी,कासाडी या नद्या मुसळधार पावसामुळे दुथडी वाहत होत्या.सुट्टीचा दिवस असल्याने बंदी असलेल्या पर्यटनस्थळांवर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.नागरिकांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.