नवी मुंबई शहरात दोन दिवसांत जोर‘धार’; १५१ मिमी पावसाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 01:13 AM2020-08-30T01:13:19+5:302020-08-30T01:13:51+5:30

नवी मुंबईत पावसाने शुक्रवारपासून पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. दिवसभर सुरू असलेल्या पावसात शहरातील विविध ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या असून, रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे अनेक वाहने बंद पडली होती.

Heavy rain in two days in Navi Mumbai city; 151 mm of rainfall recorded | नवी मुंबई शहरात दोन दिवसांत जोर‘धार’; १५१ मिमी पावसाची नोंद

नवी मुंबई शहरात दोन दिवसांत जोर‘धार’; १५१ मिमी पावसाची नोंद

Next

नवी मुंबईनवी मुंबई शहरात दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली, चोवीस तासांत सुमारे १५१.५८ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सखल भागातील रस्त्यांवर पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या. तर, वाशी विभागात एक झाड कोसळले.

नवी मुंबईत पावसाने शुक्रवारपासून पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. दिवसभर सुरू असलेल्या पावसात शहरातील विविध ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या असून, रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे अनेक वाहने बंद पडली होती. शुक्रवारी रात्री पावसाचा जोर अधिक वाढला होता. या पावसात वाशी विभागातील एक झाड कोसळले असून, दिवा गाव परिसरात आग लागल्याची एक दुर्घटना घडली. शनिवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरूच होती. दुपारी काही काळ पावसाचा जोर ओसरला होता. मात्र, संध्याकाळी पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाली होती. शहरातील विविध नोडमध्ये २४ तासांत शनिवारी दुपारपर्यंत १५१.५८ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली असून, यामध्ये वाशी विभागात सर्वाधिक १६४.१० मिमी पाऊस पडला आहे. कोपरखैरणे विभागात १६३.०५ मिमी, बेलापूर १४३.०६ मिमी, ऐरोली १४१.४ मिमी तर नेरुळ विभागात १३५.३० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

वाशीत खड्ड्यामुळे रिक्षा उलटली
शहरात मुसळधार पाऊस पडत असल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्यावरील आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता. वाशी विभागात रस्त्यावरून धावणाऱ्या रिक्षाचे चाक खड्ड्यात अडकल्याने रिक्षा पलटी झाल्याची दुर्घटना घडली.

उरणला पावसाने झोडपले
दोन दिवसांपासून सतत कोसळणाºया मुसळधार पावसाने उरणकरांना झोडपून काढले आहे.उरण शहरातील बोरी-शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय, वैष्णवी हॉटेल,आपला बाजार,साठे हॉटेल, गणपती चौक, पालवी हॉस्पिटल, राजपाल नाका परिसरातील रस्त्यांवरही पाणी साचले होते. उरण परिसरातील जेएनपीटी- नवघर, द्रोणागिरी आणि परिसरातील काही रस्त्यांवर पाणी साचले. रस्त्यात साचलेल्या पाण्यामुळे मात्र वाहनचालकांना वाहने चालविणे कठीण झाले होते.मुसळधार पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळित झाले आहे.

पनवेलमध्ये १८०मिमी पावसाची नोंद
पनवेलमध्ये शुक्रवार, शनिवार या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. दोन दिवसांत १८० मिमी पावसाची नोंद झाली, या वर्षी आॅगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद करण्यात आली आहे. या मुसळधार पावसाने गाढी, कासाडी या नद्या तुडुंब वाहत असल्या, तरी दोन्ही नद्यांनी इशारा पातळी ओलांडली नसल्याचे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने स्पष्ट झाले. दरम्यान, शनिवारी पावसाने थोड्या-थोड्या वेळाने उसंत घेतल्याने कोठेही पावसाचे पाणी तुंबल्याची घटना घडली नाही.

Web Title: Heavy rain in two days in Navi Mumbai city; 151 mm of rainfall recorded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.