शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

रोडपालीत अवजड वाहनांची पार्किंग, रहिवाशांची गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 2:02 AM

कळंबोलीसह रोडपाली परिसरातील नागरी वसाहतीत अवजड वाहनांनी शिरकाव केला आहे.

- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : कळंबोलीसह रोडपाली परिसरातील नागरी वसाहतीत अवजड वाहनांनी शिरकाव केला आहे. ट्रक, टेम्पो आणि कंटेनरसारखी वाहने इमारतींच्या अगदी प्रवेशद्वारावर बेकायदा पार्क केली जात असल्याने रहिवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या प्रकाराकडे वाहतूक विभागाने अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.कळंबोलीजवळ रोडपाली गावालगत नागरी वस्ती वाढली आहे. सिडकोच्या माध्यमातून येथे सेक्टर्स निर्माण केले आहेत. खारघरप्रमाणेच येथेसुद्धा विस्तीर्ण रस्ते आणि पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत; परंतु बेकायदा पार्किंगमुळे या सुविधांचा पुरता बोजवारा उडाल्याचे दिसून येते. रस्त्यांवर दोन्ही बाजूने अवजड वाहने उभी केली जातात. त्यामध्ये ट्रक, टँकर आणि कंटेनर यांचे प्रमाण जास्त आहे. बाजूलाच स्टील मार्के ट असल्याने मोठ्या प्रमाणात वाहने या भागात येतात. यातील बहुतांशी वाहने शेजारच्या नागरी वसाहतीत पार्क केली जात आहेत. विशेष म्हणजे, याच वसाहतीत संबंधित ट्रान्सपोर्ट कंपन्यांचे मालक, चालक तसेच वाहक राहत असल्याने आपली वाहने घराजवळ पार्क करण्याचा कल वाढला आहे. वसाहतीतील रस्ते अरुंद असल्याने या अवजड वाहनांमुळे वाहतूककोंडीचा त्रास होत आहे.नागरी वसाहतीत अवजड वाहनांना बंदी आहेत. त्यासाठी सिडकोने ठिकठिकाणी हाइट गेज लावले आहेत. मात्र, हे हाइट गेज तोडून वाहनचालक सर्रासपणे वाहने वसाहतीअंतर्गत रस्त्यांवर पार्क करीत असल्याचे दिसून येते. कळंबोली सेक्टर १० ई परिसरातील परिस्थिती अत्यंत संतापजनक आहे. येथील रस्त्यांना पार्किंगचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला अवजड वाहने उभी केली जात आहेत. अनेक भागात इमारतींच्या अगदी प्रवेशद्वारावर वाहने उभी केली जात असल्याने रहिवाशांच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. रहिवाशांना आपल्या दुचाकीही बाहेर काढतानाही कसरत करावी लागत आहे. गाड्यांचा दिवसरात्र कर्कश आवाज, धूर, हॉर्नचा गोंगाट आदीमुळे रहिवासी कमालीचे त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात रहिवाशांच्या वतीने अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. मात्र, कोणतीही कारवाई झाली नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.कळंबोलीच्या सेक्टर १७ मध्येही कमी-अधिक प्रमाणात अशीच अवस्था आहे. त्याचप्रमाणे या परिसरातील मोकळ्या जागांवर बेकायदा पे अ‍ॅण्ड पार्किंगसुद्धा सुरू करण्यात आले आहे. या प्रकाराकडेही संबंधित विभागाकडून डोळेझाक केली जात असल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे.मद्यपी चालकांचा उच्छादरस्त्यावर आणि मोकळ्या भूखंडावर बेकायदेशीरपणे अवजड वाहने उभी केली जातात. या वाहनांचे चालक व वाहक येथेच जेवण बनवतात. रात्रीच्या वेळी तर या ठिकाणी सर्रासपणे दारूच्या पार्टी चालतात. अनेकदा त्यांच्यात मोठमोठ्याने भांडणे होतात. या प्रकारामुळे परिसरातील महिलांना रात्रीच्या वेळी बाहेर पडणे अवघड झाल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.स्वच्छ भारत अभियानाचा बोजवाराआपली अवजड वाहने रस्त्यावर बेकायदेशीर पार्क करून चालक आणि वाहक त्यातच राहतात. आंघोळ, प्रात:विधी तसेच जेवण आदी दैनंदिन क्रिया उघड्यावरच केल्या जातात. त्यामुळे परिसरात कमालीची दुर्गंधी पसरली जात आहे. ट्रक व कंटेनरचालकांच्या या उच्छादामुळे परिसरातील स्वच्छतेला बाधा निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या स्वच्छ शहर अभियानाला हरताळ फासला जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईTrafficवाहतूक कोंडी