पनवेल : कळंबोली-जेएनपीटी राष्ट्रीय महामार्गावर सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची अनधिकृत पार्किंग पाहावयास मिळत आहे. वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अवजड वाहने सर्रास रस्त्याच्या दुतर्फा पार्किं ग केली जात असल्याने या ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.विशेषत: सायंकाळी या मार्गावर विविध ठिकाणावरून येणारे ट्रक, ट्रेलरचालक सर्रास रस्त्याच्या कडेला ही वाहने उभी करतात. या मार्गालगत जोडरस्ता म्हणून सर्व्हिस रोडदेखील उभारण्यात आला आहे. हा सर्व्हिस रोडदेखील पूर्णपणे अवजड वाहनांनी व्यापला आहे. सायन पनवेल महामार्ग, कळंबोली मुंब्रा, मुंबई-गोवा महामार्ग आदी महत्त्वाचे मार्ग या ठिकाणी असल्याने या संपूर्ण परिसरात वाहनांची सतत वर्दळ असते. त्यातच कळंबोली-जेएनपीटी मार्गावर नौपाडा गावाजवळ संपूर्ण मार्गच अनधिकृत पार्किंगमुळे गिळंकृत झाल्याने या ठिकाणी जाणाऱ्या वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गालगत असलेल्या नौपाडा गावात जाण्याचा रस्ताच बंद झाल्याने कळंबोली वाहतूक पोलिसांनी याबाबत कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.अनधिकृत वाहन पार्किं ग करणाºयावर वेळोवेळी कारवाई करीत असतो. सोमवारी ४७ जणांवर कारवाई केली आहे.- अंकुश खेडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, कळंबोलीगुन्हे दाखल करण्याची गरजमहामार्गावर सर्रास पार्किं ग करणाºया वाहनचालकांना वाहतूक पोलिसांची भीती राहिली नाही. अनधिकृत पार्किंगचा दंड म्हणून केवळ २०० रुपये या वाहनचालकांकडून दंड आकारला जातो. २०० रुपयांत रात्रभर गाडी उभी करण्याची जणू परवानगीच या वाहनचालकांना मिळत असल्याने दंडाची भीती या वाहनचालकांना राहिली नाही. अशा वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
अवजड वाहनांचा महामार्गाला विळखा, अपघाताचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 3:22 AM