नवी मुंबई : पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्र मगड तालुक्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाविद्यालयीन तरु णांनी पुढाकार घेतला असून बेलापूर येथील पारसिक हिल येथे गेल्या एक महिन्यापासून शैक्षणिक तसेच योगसारखे उपक्र म शिकविले जात आहेत. नित्य सारथी फाउंडेशनच्या माध्यमातून आदिवासी पाड्यातील एका शाळेच्या तीन वर्गखोल्यांचे बांधकाम देखील करण्यात आले आहे.
आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अत्यल्प सुविधा आणि मार्गदर्शनाचा अभाव असतो त्यामुळे त्यांना दहावीसारख्या महत्त्वाच्या वर्षी विविध समस्यांना सामोरे जावे लागते. या विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या प्रत्येक विषयाचे मार्गदर्शन व्हावे यासाठी काही तरु णांनी एकत्र येत एक अभिनव संकल्पना राबविली आहे. जयेश किरंगे यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह विक्र मगड आणि वाडा तालुक्यातील साखरे, असनास, खैरे अंबावली आणि वाकी या चार गावातील आदिवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना गेल्या शैक्षणिक वर्षात शाळेत जाऊन प्रत्येक विषयाचा अभ्यास करवून घेतला. अभ्यासाविषयी मार्गदर्शन केले. यादरम्यान आदिवासी पाड्यात सुविधांचा अभाव आहे. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाल्यास त्यांचे भवितव्य घडू शकते याची जाणीव किरंगे यांना झाल्याने नित्य सार्थी फाउंडेशन या संस्थेची स्थापना करून नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरु वातीपासूनच दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्र मात असलेल्या विविध विषयाचे मार्गदर्शन व्हावे यासाठी सुमारे ५0 विद्यार्थ्यांना बेलापूर येथील पारसिक हिल येथे आणण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना अवघड वाटणाºया पाच विषयांचा अभ्यास गेल्या महिनाभरापासून करून घेतला जात आहे. शिक्षणाबरोबर या विद्यार्थ्यांना योग व इंग्रजी बोलणे शिकविले जात आहे. सामाजिक कार्यासाठी बांद्रा शैक्षणिक ट्रस्टमधील शिवम कापडिया, मेघा मोधा, तनिषा शिंदे,आकांक्षा राठोड, कांची शाह, अमोघ तेलंग, सनी भावसार, कृपा शाह, प्रीती आणि आयुष गोयंका आदी विद्यार्थी फाउंडेशनमध्ये स्वयंसेवक म्हणून सक्रि य झाले आहेत.आदिवासी पाड्यात पाणी प्रकल्पच्आदिवासी पाड्यातील महिला आणि लहान मुलींना पाण्यासाठी कित्येक किलोमीटर पायपीट करावी लागते. त्यासाठी दिवसाला अनेक तास वाया जातात. फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या मदतीने गावापासून दीड किलोमीटर अंतरावर एक विहीर खोदून बांधकाम करण्यात आले. विहिरीत सौर ऊर्जेवर चालणारी मोटार बसवून पाइपलाइनच्या साहाय्याने गावात ५000 लीटरची पाण्याची टाकी उपलब्ध करून दिली आहे.