पोलादपूर दुर्घटनेत जीवाची बाजी लावणा-या महाबळेश्वर ट्रेकर्सना मदतीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 08:23 PM2018-08-11T20:23:14+5:302018-08-11T20:25:35+5:30
खराब हवामानाशी दोन हात करीत या ट्रेकर्सनी हे मदतकार्य केले.
- वैभव गायकर,
पनवेल : पोलादपूर दुर्घटनेत कोंकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचा-यांना आपला जीव गमवावा लागाला . अतिशय दुर्दैवी या घटनेत आंबेनळी घाटात जीवाची बाजी मारत महाबळेश्वर ट्रेकर्सनी मृतदेह शेकडो फूट खोलीतून वर आणले. खराब हवामानाशी दोन हात करीत या ट्रेकर्सनी हे मदतकार्य केले. या ट्रेकर्सची पनवेलमधील दोन सामाजिक संघटनानी दखल घेत घेऊन त्यांचा सत्कार केला .
विशेष म्हणजे अतिशय मोलाचे कार्य करणा-या या ट्रेकर्सना मदतीचा हात देखिल या संघटनांनी दिला आहे . मयूर भोईर सामाजिक , सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ व क्रांतीज्योत मित्र मंडळ शिरढोण यांच्यामार्फत या ट्रेकर्सची महाबळेश्वर येथे भेट घेऊन ट्रेकिंग साठी आत्याधुनिक साधनसामुग्री उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे २५ हजारांची मदत करण्यात आली. जेणे करून या ट्रेकर्सना अत्याधुनिक साहित्य , रोप आदींसह ट्रेक साठी लागणा-या महत्वाच्या गोष्टी खरेदी करता येतील . यावेळी मयूर भोईर , भरत भोईर , कुंडेवहाळ ग्रामपंचायतीचे सदस्य राजन भगत , लहू कातकरी , अशोक मुंडकर आदी यावेळी उपस्थित होते . अंबेनवली घाटातील थरारक प्रसंगात आपला अनुभव यावेळी महाबळेश्वर ट्रेकर्सनी यावेळी कथन केला . यावेळी महाबळेश्वर ट्रेकर्सग्रुपचे. बाबा बांठिया, अनिल केळगणे, निलेश बावळेकर , सनी बावळेकर आदी उपास्थीत होते .
महाबळेश्वर ट्रेकर्सनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी घडलेल्या घटनेत मदकार्य पोहचविले आहे . यामध्ये दासगांव, जुई-महाड, माळीण गांव भूस्खलन, मांढरदेवी चेंगराचेंगरी, पसरणी घाट, विशालगड, महाड येथील सावित्री पूल दुर्घटना, अंबनेळी बस दुर्घटना आदींचा समावेश आहे . स्वतःच्या जीवाची बाजी लावणारे महाबळेश्वर हे ट्रेकर्स हे खरे हिरो आहेत . त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे . याकरिता आम्ही त्यांची भेट घेऊन त्यांना मदतीचा हात दिला असल्याचे समाजसेवक मयूर भोईर यांनी सांगितले .