गरोदर महिलेच्या हत्येप्रकरणी पतीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 02:41 AM2017-12-28T02:41:54+5:302017-12-28T02:41:57+5:30

नवी मुंबई : पत्नी पाच महिन्यांची गरोदर असतानाही तिची हत्या करणाºया पतीला रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

Her husband arrested in murder case | गरोदर महिलेच्या हत्येप्रकरणी पतीला अटक

गरोदर महिलेच्या हत्येप्रकरणी पतीला अटक

Next

नवी मुंबई : पत्नी पाच महिन्यांची गरोदर असतानाही तिची हत्या करणाºया पतीला रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. दोघांमधील सततच्या भांडणातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. हत्येनंतर त्याने पोलिसांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता.
ममता गुप्ता (२४), असे मयत महिलेचे नाव असून, सोमवारी सकाळी तिचा राहत्या घरात मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पती अखिलेश यानेच पोलिसांकडे तक्रार केली होती. घराबाहेर गेल्यानंतर पत्नी घरात एकटी असताना तिची हत्या झाल्याचे त्याने भासवले होते. याकरिता मारेकºयाने पुढच्या दरवाजाने घुसून पत्नीची हत्या केल्यानंतर पुढचा दरवाजा आतून बंद करून पाठच्या दरवाजाने पळ काढल्याचा बनाव त्याने रचला होता. पोलिसांना चौकशीत पतीवरच संशय आला होता. त्यामुळे अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी पती अखिलेश यालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या दरम्यान त्याने पत्नीच्या हत्येची कबुली दिल्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत काटकर यांनी सांगितले. मयत ममता ही पाच महिन्यांची गरोदर असतानाही अखिलेश याने गळा चिरून तिची हत्या केली. त्यांना दीड वर्षांची एक मुलगी आहे. अखिलेशच्या विवाहबाह्य संबंधांवरूनही त्यांच्यात वाद व्हायचा, असेही पोलिसांकडून समजते. पत्नीपासून सुटका मिळवण्यासाठी त्याने रविवारी रात्री कट रचला. मध्यरात्री हत्या करून बाहेर जाऊन घरी आल्यानंतर घटना समोर आल्याचा बनाव रचला होता; परंतु पोलिसांची दिशाभूल करण्याचा त्याचा प्रयत्न फसला व त्यानेच पत्नीची हत्या केल्याचे उघड झाले.

Web Title: Her husband arrested in murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.