महापालिकेच्या शाळांसह विद्यार्थी होणार हायटेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 01:20 AM2020-01-05T01:20:18+5:302020-01-05T01:20:21+5:30

नवी मुंबई महापालिकेच्या १२ शाळांमध्ये आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम २०१८-१९ अंतर्गत डिजिटल क्लासरूम आणि मिनी सायन्स सेंटर तयार करण्यात येणार आहे.

Hi-Tech will be a student with municipal schools | महापालिकेच्या शाळांसह विद्यार्थी होणार हायटेक

महापालिकेच्या शाळांसह विद्यार्थी होणार हायटेक

Next

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या १२ शाळांमध्ये आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम २०१८-१९ अंतर्गत डिजिटल क्लासरूम आणि मिनी सायन्स सेंटर तयार करण्यात येणार आहे. यामुळे महापालिकेच्या शाळा हायटेक होणार असून, विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधांचा लाभ घेता येणार असून, यामुळे पालिका शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थीही हायटेक होणार आहेत. या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळाली आहे.
नवी मुंबईतील महानगरपालिकांच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा शैक्षणिकदृष्ट्या विकास व्हावा, तसेच विद्यार्थ्यांना सायन्स विषयाची गोडी लागून विद्यार्थ्यांचा कल सायन्स विषयाकडे वाढावा, याकरिता शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम व मिनी सायन्स सेंटर उपलब्ध करण्यात येणार आहे. शहरातील खासगी शाळांच्या तुलनेत महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांनाही आधुनिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार असल्याने महापालिका शाळांसह विद्यार्थीही हायटेक होणार आहेत. आमदार निधीमधून महापालिकेला ६६ लाख रु पयांचा निधी उपलब्ध झाला असून, नवी मुंबई महानगरपालिकेच्या १२ शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम व मिनी सायन्स सेंटर उपलब्ध होणार आहे.
>डिजिटल क्लासरूम
होणाºया शाळांचा तपशील
१ शाळा क्र मांक ३ आग्रोळी गाव
२ शाळा क्र मांक ५ दारावे गाव
३ शाळा क्र मांक ६ करावे गाव
४ शाळा क्र मांक १६ शिवाजीनगर, नेरु ळ
५ शाळा क्र मांक २० तुर्भे गाव
६ शाळा क्र मांक २२ तुर्भे स्टोअर
७ शाळा क्र मांक २४ हनुमाननगर
८ शाळा क्र मांक २५ इंदिरानगर
९ शाळा क्र मांक २७ वाशी गाव
१० शाळा क्र मांक २८ वाशी
११ शाळा क्र मांक १०२ नेरु ळ
१२ शाळा क्र मांक ११० वाशी

Web Title: Hi-Tech will be a student with municipal schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.