महासभेत सत्ताधाऱ्यांची सर्वाधिक उपस्थिती

By Admin | Published: April 28, 2017 12:43 AM2017-04-28T00:43:34+5:302017-04-28T00:43:34+5:30

सर्वसाधारण सभेमध्ये दोन वर्षांमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी व काँगे्रस नगरसेवकांनी शिस्तबद्ध कामकाज करून सर्वाधिक

The highest attendance of the legislatures in the General Assembly | महासभेत सत्ताधाऱ्यांची सर्वाधिक उपस्थिती

महासभेत सत्ताधाऱ्यांची सर्वाधिक उपस्थिती

googlenewsNext

नवी मुंबई : सर्वसाधारण सभेमध्ये दोन वर्षांमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी व काँगे्रस नगरसेवकांनी शिस्तबद्ध कामकाज करून सर्वाधिक उपस्थिती दर्शविली आहे. विरोधी पक्षातील नगरसेवकांमध्ये शिस्तीचा अभाव आढळून आला असून, अर्ध्यावर सभा सोडून जाणाऱ्यांमध्ये शिवसेना नगरसेवक आघाडीवर असल्याचे निदर्शनास आले आहे.
महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये प्रत्येक महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेला विशेष महत्त्व आहे. शहरातील विकासकामांना व पालिकेच्या धोरणांना या सभेत मंजुरी दिली जात असते. सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील सदस्यांची उपस्थिती व कामकाजामधील अभ्यासपूर्ण सहभागावरच शहराच्या विकासाची दिशा ठरत असते. सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसकडून कामकाजाची जबाबदारी स्वीकारून प्रत्येक सभेपूर्वी मीटिंग घेवून पक्षाची भूमिका निश्चित केली जात आहे. सभा सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत प्रत्येक नगरसेवकांनी उपस्थित राहावे अशा स्पष्ट सूचना नगरसेवकांना देण्यात येतात व नगरसेवकही त्या सूचनांचे तंतोतंत पालन करत असल्याचे पहावयास मिळते. अपवाद वगळता सर्व नगरसेवक सभेमध्ये उपस्थित असतात. काँगे्रसचे नगरसेवकही सभा संपेपर्यंत कामकाजामध्ये सहभागी होत असतात. परंतु विरोधी पक्षातील नगरसेवकांमध्ये मात्र शिस्तीचा अभाव आढळून येवू लागला आहे. शिवसेनेचे निवडून आलेले ३८ व २ स्वीकृत नगरसेवक आहेत. सभा सुरू झाल्यानंतर यामधील बहुतांश नगरसेवक उपस्थित असतात, पण दुपारनंतर १० ते १५ जणच सभेमध्ये उपस्थित असतात.
शिवसेना नगरसेवक सभेमध्ये थांबतच नसल्याने विरोधी पक्षाला पालिकेच्या कामकाजाविषयी गांभीर्य नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. प्रेक्षागृहात असलेल्या नागरिकांकडूनही टीका होवू लागली आहे. सेनेचे अनेक नगरसेवक आक्रमकपणे भूमिका मांडत असले तरी त्यांना साथ देण्यासाठी सहकारीच उपस्थित रहात नाहीत. अनुपस्थित राहून पक्षाची प्रतिमा मलिन करणाऱ्या नगरसेवकांना शिस्त लावायची कोणी असा प्रश्नही निर्माण झाला आहे. अर्थसंकल्पासह इतर सर्वच सभांमध्ये विरोधकांच्या खुर्च्या रिकाम्या दिसू लागल्या आहेत. भाजपाचे फक्त सहाच नगरसेवक आहेत. यामध्ये गटनेते रामचंद्र घरत वगळता इतर एकाही नगरसेवकांना अद्याप सभागृहात प्रभाव पाडता आलेला नाही. अनेक वेळा भाजपाचे नगरसेवकही सभागृहात पूर्णवेळ नसल्याचे पहावयास मिळते व सभागृहात असूनही कामकाजामध्ये सहभागी होत नाहीत.
विरोधकांच्या खुर्च्या रिकाम्या -
२६ एप्रिलला झालेल्या तहकूब सभेमध्ये शिवसेना भाजपा नगरसेवकांची बाके रिकामीच होती. ४६ पैकी फक्त १५ नगरसेवक उपस्थित होते. तब्बल ३१ जणांनी दांडी मारली होती. दुसरीकडे राष्ट्रवादी व काँगे्रस नगरसेवकांची उपस्थिती लक्षणीय असल्याने सभेचे कामकाज पाहण्यासाठी येणाऱ्यांमध्ये व प्रसारमाध्यमांमधून सत्ताधाऱ्यांमध्ये सकारात्मक व विरोधकांमध्ये सकारात्मक प्रतिमा तयार होत आहे.

Web Title: The highest attendance of the legislatures in the General Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.