राज्यातील सुरक्षा रक्षकांच्या वेतनामध्ये वाढ, १२ मंडळांसाठी वेतनवाढ लागू

By नामदेव मोरे | Published: May 3, 2023 01:51 PM2023-05-03T13:51:07+5:302023-05-03T13:51:17+5:30

५० हजार पेक्षा जास्त सुरक्षा रक्षकांना होणार लाभ

Hike in Salary of Security Guards for 12 organizations in Maharashtra | राज्यातील सुरक्षा रक्षकांच्या वेतनामध्ये वाढ, १२ मंडळांसाठी वेतनवाढ लागू

राज्यातील सुरक्षा रक्षकांच्या वेतनामध्ये वाढ, १२ मंडळांसाठी वेतनवाढ लागू

googlenewsNext

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : सुरक्षा रक्षक मंडळातील नोंदीत रक्षकांच्या वेतन व भत्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यातील १२ मंडळांसाठी वेतनवाढ व लेव्हीच्या रक्कमेत वाढ जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयाचा ५० हजार पेक्षा जास्त सुरक्षारक्षकांना लाभ होणार आहे.

सुरक्षा रक्षकांच्या वेतनामध्ये वाढ व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनीयनच्या सरचिटणीस नंदाताई माधवराव भोसले यांनी मार्चमध्ये उपोषण केले होते. माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये हा विषय मांडला होता. उपोषण व विधान परिषदेमध्ये उठविलेल्या आवाजाची दखल घेऊन शासनाने कामगारांच्या वेतनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. याविषयी प्रस्ताव सहआयुक्त माथाडी यांनी मान्यतेसाठी शासनाकडे पाठविला होता. शासनाने २ मे रोजी सुरक्षा रक्षकांच्या वेतनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून याविषयी कामगार आयुक्तांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. राज्यातील १२ सुरक्षा रक्षक मंडळांमधील कामगारांसाठी वेतनवाढ लागू होणार आहे. बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळासाठी १३७५ रुपये वेतन वाढ व ६२२ रुपये लेव्ही असे १९९७ रुपये वाढ करण्यात आली आहे. रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळासाठी १४०२ रुपये वेतनवाढ व ४६९ रुपये लेव्ही वाढविण्यात आली आहे. प्रत्येक मंडळनिहाय वेतनवाढ लागू केली आहे.

शासनाच्या निर्णयाचा राज्यातील ५० हजार पेक्षा जास्त सुरक्षा रक्षकांना लाभ होणार आहे. याशिवाय बोर्डाषच्या या निर्णयाच्या आधारावर खासगी सुरक्षा रक्षक कंपन्यांमधील सुरक्षा रक्षकांच्या वेतनामध्ये वाढ करणेही शक्य होणार आहे. यामुळे खासगी सुरक्षा कंपनीमधील ७ ते ८ लाख सुरक्षा रक्षकांच्या वेतनवाढीचा मार्गही सुकर होणार आहे.

राज्यातील विभागनिहाय मंडळ व वेतनवाढीचा तपशील

मंडळाचे नाव - वेतनवाढ - लेव्ही - एकूण वेतनवाढ

  • बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ - १३७५ - ६२२ - १९९७
  • रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ - १४०२ - ४६९ - १८७१
  • पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ - १७७४ - ३५७ - २१३१
  • नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ - १२४७ - ५११ - १७५८
  • चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ - १२१३ - ५२२ - १७३५
  • नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ - ११८० - ५०७ - १६८७
  • सांगली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ - १२९६ - ५४४ - १८४०
  • अहमदनगर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ - ७०० - २२४ - ९२४
  • अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ - १३४२ - ५७७ - १९१९
  • औरंगाबाद जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ - १४२९ - ५७९ - २००८
  • कोल्हापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ - ८४१ - ३५३ - ११९४
  • रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ - ५६० - २३५ - ७९५


संघटनेच्या सरचिटणीस नंदाताई माधवराव भोसले यांनी वेतनवाढीसाठी उपोषण केले होते. आमदार शशिकांत शिंदे यांनी विधानपरिषदेमध्ये आवाज उठविला होता. याची दखल घेऊन शासनाने वेतनवाढ केल्याबद्दल आनंद आहे. परंतु मुंबईत तीन हजार रुपये वेतनवाढ अपेक्षित होती. -अजिंक्य माधवराव भोसले, संयुक्त सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियन

Web Title: Hike in Salary of Security Guards for 12 organizations in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.