हिंदूंना आर्थिक बळकट करण्याची शपथ घेतली पाहिजे; भाजपा आमदार नितेश राणेंचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 11:04 AM2024-09-12T11:04:30+5:302024-09-12T11:05:02+5:30

कुठल्याही मौलवीने नितेश राणे खोटं बोलतोय हे व्यासपीठावर येऊन सांगावे असं आव्हान त्यांनी केले. 

Hindus should vow to strengthen their finances; Appeal of BJP MLA Nitesh Rane | हिंदूंना आर्थिक बळकट करण्याची शपथ घेतली पाहिजे; भाजपा आमदार नितेश राणेंचं आवाहन

हिंदूंना आर्थिक बळकट करण्याची शपथ घेतली पाहिजे; भाजपा आमदार नितेश राणेंचं आवाहन

पनवेल - आपल्या हिंदूनाच आर्थिक बळकट करण्याची शपथ घेतली पाहिजे. हिंदूंचे हित आधी बघा, त्यानंतर इतरांना बघू, ते पाकिस्तानात, बांगलादेशात आपल्याला मोजतात का? असा सवाल करत भाजपा आमदार नितेश राणे यांनी पु्न्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित केला आहे. पनवेलच्या उलवे येथे संकल्प सामाजिक संस्थेच्या उलवेचा चिंतामणीची महाआरती करण्यासाठी नितेश राणे आले होते. 

यावेळी नितेश राणे म्हणाले की, उलवे येथे मोठ्या प्रमाणात जे ब्रोकर्स आहेत त्यांनी तुम्ही ज्यांच्यासोबत व्यवहार करता ते हिंदूच असले पाहिजेत अशी काळजी घ्या. समोर असलेल्यांचे आधार कार्ड बघून घ्या. कारण ते स्वत:चे नावही खरे सांगत नाहीत. मी जो काही व्यवहार करेन फक्त हिंदूचीच करेन अशी शपथ आपण घेऊ, हिरव्या सापांना दूध पाजायचं नाही. हे आपले कधीच होणार नाही. इस्लाम धर्मात हिंदू काफीर असतो हे लिहिलं आहे. कुठल्याही मौलवीने नितेश राणे खोटं बोलतोय हे व्यासपीठावर येऊन सांगावे असं आव्हान त्यांनी केले. 

त्याशिवाय इस्लाम राष्ट्रात इस्लामलाच प्राधान्य दिले जाते. पाकिस्तानातील हिंदूंना विचारा, तुम्ही इस्लाममध्ये या अन्यथा मारून टाकू अशा धमक्या दिल्या जातात. त्यामुळे तुम्हीही तुमचा कडवटपणा दाखवला पाहिजे. प्रशासनाला दिसला पाहिजे. हिंदू दरारा निर्माण करेल तर आपल्याकडे कुणी वाकड्या नजरेने बघणार नाही.उलवा हिंदूंचाच असला पाहिजे. काही समस्या आली तरी मी १० मिनिटांत इथं हजर राहेन. आज महाआरतीच्या निमित्ताने मी इथं आलोय असंही नितेश राणेंनी सांगितले.
 

Web Title: Hindus should vow to strengthen their finances; Appeal of BJP MLA Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.