प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे धरणे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 12:11 AM2019-12-11T00:11:28+5:302019-12-11T00:11:43+5:30

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत काम करणारे अंगणवाडी कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून तुटपुंजा मानधनावर काम करीत आहेत.

Hold Anganwadi Sevaikas for pending orders | प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे धरणे

प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे धरणे

Next

नवी मुंबई : अंगणवाडी कर्मचाºयांच्या विविध प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्यात, तसेच त्यांचे विविध प्रश्न सोडवावेत, यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या माध्यमातून बेलापूरमधील रायगड भवन येथे धरणे आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत काम करणारे अंगणवाडी कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून तुटपुंजा मानधनावर काम करीत आहेत. या कर्मचाºयांना देण्यात येणारे मानधन वाढवावे, तसेच विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासाठी अंगणवाडी कर्मचाºयांच्या माध्यमातून धरणे आंदोलन केले.

मागण्यांमध्ये प्रामुख्याने सेविकेला तृतीय श्रेणी आणि मदतनिसांना चतुर्थ श्रेणी व सेवेचे फायदे देण्यात यावेत, अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनात वाढ, अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनाच्या ५० टक्के रक्कम पेन्शन द्यावे, भाऊबीज भेट पुन्हा सुरू करावी, रिक्त जागेवर मुख्यसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची नियुक्ती करावी, मिनी अंगणवाडी केंद्राचे रूपांतर मुख्य अंगणवाडी केंद्रात करावे, तसेच त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या सेविका आणि मदतनीस यांना सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात
याव्यात

याशिवाय अतिरिक्त कामासाठी देण्यात येणारे मानधन वाढवावे, अंगणवाडी कर्मचाºयांना आजारपणासाठी एक महिना भरपगारी सुट्टी देण्यात यावी, साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी काम करण्यासाठी करण्यात येणारी सक्ती बंद करावी, अशा विविध मागण्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या माध्यमातून एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

Web Title: Hold Anganwadi Sevaikas for pending orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.