नवी मुंबई पोलीस मुख्यालयात उभारलेल्या 50 बेडेड कोविड केअर सेंटरचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते उदघाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 09:05 PM2020-06-10T21:05:46+5:302020-06-10T21:18:07+5:30
कळंबोली येथील पोलीस मुख्यालयातील मल्टीपर्पज हॉल मध्ये हे 50 खाटांचे डेडिकेटेड कोविड 19 केअर सेंटर उभारण्यात आलेले आहे. याठिकाणी अत्याधुनिक अशा आठ बाथरूम देखील उभारण्यात आले आहे.
पनवेल - गृहमंत्री अनील देशमुख यांच्या हस्ते नवी मुंबई पोलीस दलाचे पोलीस आयुक्त संजय कुमार साहेब यांच्या पुढाकाराने नवी मुंबईपोलिस दलामधील पोलिसांना कोरोना महामारीच्या काळामध्ये व्यवस्थित औषधोपचार मिळावे म्हणून, कळंबोली येथे 50 खाटांचे डेडिकेटेड कोविड 19 केअर सेंटर कळंबोली येथील पोलीस मुख्यालयात स्थापन कारण्यात आलेल्या सेंटरचे उदघाटन कारण्यात आले.
कळंबोली येथील पोलीस मुख्यालयातील मल्टीपर्पज हॉल मध्ये हे 50 खाटांचे डेडिकेटेड कोविड 19 केअर सेंटर उभारण्यात आलेले आहे. याठिकाणी
अत्याधुनिक अशा आठ बाथरूम देखील उभारण्यात आले आहे.यावेळी बोलताना गृहमंत्री देशमुख यांनी पोलिसांच्या कामाचे कौतुक केले.राज्यात 3000 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.त्यापैकी 35 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांसाठी कोविड केअर सेंटर उभारण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.मृत्युमुखी पावलेल्या पोलिसांच्या वारसांना नोकरी दिली जाणार आहे.तसेच राज्य शासन 50 लाखाची मदत करणार आहे.55 वयोगटातील पोलिसांना घरीच थांबण्याच्या सूचना दिल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.