शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

नवी मुंबईत घराच्या किमती महागल्या; NRI सीवूड्समध्ये 2 BHKची ४ कोटींना विक्री

By नारायण जाधव | Published: November 08, 2023 12:52 PM

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतीपथावर असताना किमती गगनाला भिडल्या

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: येथील रिॲलिटीच्या किमती गगनाला भिडल्या असून प्रति चौरस फुटाची किंमत आता ४० हजार रूपये झाली आहे. पाम बीचवरील NRI सीवूड्समध्ये 2 BHK साठी ४ कोटींची रुपये मोजावी लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या व्यतिरिक्त सिडकोचे हस्तांतरण शुल्कदेखील 40 लाख रुपये इतके आहे. यास दुजोरा देताना रियल्टर्स फोरम क्रेडाइ-एमसीएचआय -नवी मुंबईचे वरीष्ठ उपाध्यक्ष मनोहर श्रॉफ म्हणाले की, शहरातील रिअल इस्टेटच्या किंमती आता अमिताभ बच्चन यांच्या शेजारच्या परिसराएवढ्या झाल्या आहेत. श्रॉफ यांच्या म्हणण्यानुसार नेरुळमध्ये पाम बीच मार्गाजवळच्या एका सोसायटीमध्ये सहा-बीएचके ड्युप्लेक्सची 34 कोटींना विक्री झाल्याची माहिती आहे.

“सर्वोत्तम कनेक्टिव्हिटी, सर्व ठिकाणी सुरु असलेला संरचनात्मक विकास यासारखे घटक दर्जेदार जीवनशैली देणारी घरे उपलब्ध करुन देत असल्यामुळे रियल्टी किमतींमध्ये वाढ झालेली आहे,” असे ते म्हणाले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतीपथावर आहे तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे (एमटीएचएल) काम जवळपास पूर्ण होत आले आहे. या व्यतिरिक्त शासन देखील एमटीएचएलला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासोबत जोडण्याच्या प्रयत्नात आहे. “पाम बीच रोड हाय स्ट्रीट रिटेल, करमणूक, दर्जेदार शिक्षण आणि वैद्यकीय सुविधांसारख्या सर्वोच्च प्रगत संरचनांनी सज्ज आहे,” अशी माहिती 9 पीबीआर अतिशय आलिशान निवासी प्रकल्पाच्या प्रवक्त्याने दिली. संरचना आणि रियल इस्टेट विकास एकमेकांचे पुरक असतात. वाशी खाडीच्या पुल तसेच ट्रान्स हार्बर रेल लिंक सारख्या प्रकल्पांचा पाया घातला गेल्यावर लगेचच रियल्टीच्या किमतींमध्ये वाढ झालेली आढळून आली असल्याचे, 40 वर्षांपेक्षा जास्त काळापासून नवी मुंबईचे रहिवासी असलेल्या बी. एन. कुमार यांनी सांगितले.

महत्वाच्या संस्थांद्वारे संचालन होणारी महाविद्यालये आणि प्रसिद्ध  विद्यापीठे इथे असल्यामुळे हा भाग महाराष्ट्राची उच्च शैक्षणिक राजधानी म्हणून उदयान्वीत होत आहे. त्याचप्रमाणे इथे भव्य मॉल्स, मल्टिप्लेक्सेस तसेच ख्यातनाम ज्वेलरी ब्रॅंड्सची आउटलेट्स सुध्दा दिसतात, असे कुमार म्हणाले. नेरुळमध्ये पाम बीच रोड जवळ असलेल्या भूखंडाची किंमत वाढून जुलै 2021 मध्ये 6.72 लाख रुपये चौरस मीटरवर पोहोचली होती, तर सिडकोची आधारभूत किंमतच आता 1.04 लाख रुपये चौरस मीटर पेक्षा जास्त आहे. घणसोलीच्या एका रहिवासी तसेच व्यावसायिक भूखंडाची विक्री 3 लाख रुपये प्रति चौरस मीटर एवढ्या किमतीला मागच्या वर्षी जूनमध्ये झाली होती.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईHomeसुंदर गृहनियोजन