महापालिकेकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, महापौरांनी केले अभिनंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 05:30 AM2019-07-01T05:30:40+5:302019-07-01T05:30:45+5:30

मार्च २0१९ मध्ये झालेल्या दहावी एस.एस.सी. बोर्ड परीक्षेमध्ये नवी मुंबई महापालिकेच्या १७ माध्यमिक शाळांमध्ये सर्वोत्तम गुण मिळालेल्या तीन विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.

Hon'ble students honored by municipal corporation, congratulated by mayor | महापालिकेकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, महापौरांनी केले अभिनंदन

महापालिकेकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, महापौरांनी केले अभिनंदन

Next

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या, ई.टी.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेणाºया एसएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या, पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झालेल्या तसेच सीबीएसई बोर्डात सर्वाधिक गुण मिळविलेल्या शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांना महापालिकेच्या शनिवारी २९ जून रोजी संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेत सन्मानित करण्यात आले
मार्च २0१९ मध्ये झालेल्या दहावी एस.एस.सी. बोर्ड परीक्षेमध्ये नवी मुंबई महापालिकेच्या १७ माध्यमिक शाळांमध्ये सर्वोत्तम गुण मिळालेल्या तीन विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. यामध्ये महापालिकेच्या कोपरखैरणे सेक्टर ७ येथील शाळेतील विद्यार्थिनी ईश्वरी भानुदास रनवरे, सेक्टर ५ येथील हिंदी माध्यम शाळेतील भारती हरिशंकर गुप्ता, नेरूळ येथील माध्यमिक शाळेची फातिमा कासिम अन्सारी या तीन गुणवंत विद्यार्थिनींना सन्मानित करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या ई.टी.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्र येथे विशेष प्रशिक्षण घेणारे एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये अक्षम विभागातील हित निरंजन सोमाणी, कर्णबधिर विभागातील मनाली विवेक समेळ, मतिमंदत्व विभागातील श्रेय विरेन शाह, अंध विभागातील शुभम नारायणदास मिश्रा, अमेय सुनिल सावंत आदी विद्यार्थ्यांचे देखील अभिनंदन करण्यात आले.
पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नवी मुंबई महापालिका शाळांतील २0 गुणवंत विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवून शिष्यवृत्ती संपादन केली आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज शिरसाठ, श्रावणी मालुसरे, अथर्व मोरे, संचिता बावडेकर, संकेत कांबळे, साहिल म्हामुलकर, हर्षदा सिंघन, पवन येरे, करिष्मा गीते, ईशा भालेकर, शार्दुल राजगुलकर, हर्षा गायकवाड, समिक्षा सोनकांबळे, अनन्या चतुर्वेदी, उमफारूख शेख, सनीव गावकर, सुवर्णा कलवले, मंथन पयेर, पूर्व माध्यमिक विभागात तन्वी येलवे, लक्ष्मी पटेल या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
सीबीएसई बोर्ड परीक्षेत एस.एस.सी. मध्ये सर्वाधिक गुण मिळवून नवी मुंबई शहरातील तीन गुणवंत विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रासह चेन्नई विभागात सर्वप्रथम यशस्वी होण्याचा बहुमान मिळविलेला आहे. यामध्ये धात्री कौशल मेहता, फातिमा कासिम अन्सारी, भुवी घोष या विद्यार्थ्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी महापौर जयवंत सुतार यांच्या
हस्ते, उपमहापौर मंदाकिनीर् म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., स्थायी समिती सभापती नवीन गवते, सभागृह नेते रवींद्र इथापे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले आदी पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.

Web Title: Hon'ble students honored by municipal corporation, congratulated by mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.