वैभव गायकर,पनवेल: प्रसिद्ध गायक हनी सिंग चे लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करुन त्यामधून करोडो रुपयांचा फायद्याचे लालच दाखवून खारघर मधील रहिवासी दीपक ठोंबरे यांना तब्बल ६३ लाख ५० हजारांनी गंडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फेस्टिव्हिना म्युजिक फेस्टिवल या बोगस कंपनीच्या माध्यमातुन विवेक रवी रमण यांनी हि फसवणूक केली असल्याचा आरोप करीत दीपक ठोंबरे यांनी नवी मुंबई पोलीस ठाण्यात हि तक्रार दाखल केली आहे.
हनी सिंगचा शो आयोजित करून बक्कळ पैसे कमवता येतील. हा नफा ५ ते ६ कोटींच्या घरात असणार आहे.तसेच याबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया मी पूर्ण केली आहे.यासाठी काही लाखो रुपये खर्च येणार असल्याचे विवेक रमण याने दीपक ठोंबरे यांना सांगितले.याबाबत विवेक रमण याने बुक माय शो ची खोटी बुकिंग देखील ठोंबरे यांना दाखवली.तसेच एमएमआरडीए कडे देखील शो च्या जागेसाठी बुकिंग केली होती.या कार्यक्रमासाठी टप्प्या टप्प्याने ६३ लाख ५० हजार रुपये उकळले. बेकीसीला हा शो पार पडला.
मात्र, विवेक रमण यांनी व्हेंडरचे पैसे बुडविल्याने हा शो फ्लॉप झाला.याबाबत दीपक ठोंबरे यांच्या सोबत विवेक रमण याने अग्रीमेंट देखील केली होती.मात्र शो फ्लॉप झाल्यावर ठोंबरे यांना पैसे परत देण्याचे आश्वासन देत पीडीसी चेक दीपक ठोंबरे यांना दिले मात्र ते चेक देखील बँकेत वटले नसल्याने दीपक ठोंबरे यांनी पनवेल न्यायालयात विवेक रमण यांच्या विरोधात चेक बॉम्सची केस दाखल केली आहे.याबाबत दीपक ठोंबरे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालया अंतर्गत नेरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.याबाबत फसवणूक केलेले विवेक रमण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद असल्याचे समजते.