लोकमत न्यूज नेटवर्कमाथेरान : नगरपरिषदेने आजवर अनेक सेवाभावी उपक्रम राबविले असून, यावर्षी पहिल्यांदाच समाजाला एक वेगळी दिशा देणारा स्तुत्य उपक्र म हाती घेतला आहे. शासनाकडून प्रतिवर्षी थोर महान समाजसुधारक यांच्या जयंत्या साजऱ्या केली जातात; परंतु या वेळेस शाहू महाराजांची जयंती एका अभिनव पद्धतीने साजरी करण्याचा मनोदय मुख्याधिकारी डॉ. सागर घोलप यांनी नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्याचे ठरविले आहे.१९१८ साली शाहू महाराजांनी सर्वप्रथम आंतरजातीय विवाह कायदा लागू केला आणि येत्या शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून माथेरानमध्ये आणि राज्यात प्रथमच आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना ‘शिज्योशाबा’ सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यातील आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आमंत्रित करण्यात आले असून, २६ जून शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त १०० जोडप्यांना २६ आणि २७ जून या दोन दिवसांची माथेरान ट्रीप मोफत देण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी डॉ. सागर घोलप यांनी सांगितले आहे. या वेळी सर्वच जोडप्यांना प्रमुख सेलेब्रिटींंच्या हस्ते ‘शिज्योशाबा’ युनिक नावाचे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांची दोन दिवस कार्यक्र मासाठी उपस्थिती बंधनकारक आहे. कार्यक्रम २६ जूनला माथेरान येथील बाइक हॉटेलमध्ये सकाळी ९.३० वाजता होणार आहे. आॅनलाइन रजिस्ट्रेशनसाठी ६६६.्रल्ल३ी१ूं२३ें३ँी१ंल्ल.ूङ्मे या वेबसाइटवर संपर्क करण्याचे आवाहन मुख्याधिकारी डॉ. सागर घोलप यांनी के ले आहे.
आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचा होणार सन्मान
By admin | Published: June 21, 2017 5:47 AM