नवी मुंबईतील एक हजार शिक्षकांचा सन्मान
By कमलाकर कांबळे | Published: September 5, 2023 04:54 PM2023-09-05T16:54:59+5:302023-09-05T16:57:31+5:30
नवी मुंबईला हा लौकिक मिळवून देण्यात शिक्षकांचा मोठा वाटा असल्याचे संजीव नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.
नवी मुंबई : गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त नवी मुंबईतील महापालिका आणि खासगी शाळेतील १००० शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि प्रशस्तिपत्रक देऊन शिक्षक व प्राचार्यांचा गौरव करण्यात आला.
आज नवी मुंबई देशातील सर्वांत स्वच्छ आणि राहण्यायोग्य पसंतीचे शहर बनले आहे. नवी मुंबईला हा लौकिक मिळवून देण्यात शिक्षकांचा मोठा वाटा असल्याचे संजीव नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संजीव नाईक, नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी सभापती डॉ. जयाजी नाथ, शिक्षण मंडळाचे माजी सभापती एकनाथ पाटील, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, महामंत्री डॉक्टर राजेश पाटील आदी उपस्थित होते.