कोकण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा महसूल मंत्र्यांच्या हस्ते गौरव

By कमलाकर कांबळे | Published: August 8, 2023 02:31 PM2023-08-08T14:31:00+5:302023-08-08T14:31:38+5:30

महसूल सप्ताह दरम्यान उत्कृष्ट काम करणाऱ्या  अधिकारी व कर्मचाऱ्यांना मंगळवारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.  

Honours, officers and employees of Konkan Division by Revenue Minister | कोकण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा महसूल मंत्र्यांच्या हस्ते गौरव

कोकण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा महसूल मंत्र्यांच्या हस्ते गौरव

googlenewsNext

नवी मुंबई- महसूल सप्ताह दरम्यान उत्कृष्ट काम करणाऱ्या  अधिकारी व कर्मचाऱ्यांना मंगळवारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.   कोकण विभागाच्या सात ही जिल्हयांमध्ये  विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या नवनवीन संकल्पनेतून महसूल सप्ताह यशस्वीरित्या राबविल्याबद्दल महसूल मंत्र्यांनी अभिनंदन केले. 

राज्यात १ ते ७ ऑगस्ट  या कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन  करण्यात आले होते. विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या नेतृत्वात या सप्ताह दरम्यान संपूर्ण कोकण विभागात विविध लोकाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.कल्याणकर यांनी  या सप्ताह दरम्यान कोकण विभागातील प्रत्येक जिल्हयात भेट देवून  उपक्रम कसे राबविले जात आहेत,  याचा आढावा घेतला. 

विभागातील सातही जिल्हयातील मंडळ स्तरावर, तालुका व जिल्हास्तरावर महसूल दिनाच्या कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा  गौरव करण्यात आला तसेच युवा संवाद या कार्यक्रमात युवकांशी संवाद साधून दाखले वितरण करण्यात आले.  स्पर्धा  परीक्षा मार्गदर्शन, आरोग्य शिबीर घेणे, इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. “ एक हात मदतीचा” या कार्यक्रमांतर्गत नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधीत झालेल्या शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई देणे व इतर कार्यक्रम घेण्यात आले.  तर जन संवाद या कार्यक्रमामध्ये शासकीय जमिनीचे भाडेपट्टयांचे नुतनीकरण, ज्येष्ठ नागरिकांशी संवाद, संजय गांधी निराधर योजनेअतंर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण. ई पीक  पाहणी, सलोखा योजना राबविणे, इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. तसेच महसूल आदालतींचे नियेाजन करण्यात आले.   

‘एक गांव एक सलोखा’ योजना राबविण्यात आली.  “सैनिक हो तुमच्यासाठी” या कार्यक्रमात माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या पाल्यांना विविध प्रकरणांचे दाखले देण्यात आले. अनुकंपातत्वावर कर्मचारी यांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले.  तर महसूल संवर्गातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यात आले.

महसूल सप्ताहाच्या शुभारंभाला विभागीय आयुक्त कार्यालयात  ‘जगणे सुंदर’ या विषयांवर प्रशांत देशमुख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.  यावेळी आर्थिक व्यवस्थापनावर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.   “लक्ष्मी योजने” अंतर्गत सातही जिल्हयात लाभार्थ्यांना ७/१२ वितरण करण्यात आले.

महसूल सप्ताह सांगता समारंभानिमित्त महसूल सप्ताह दरम्यान उत्कृष्ट काम करणाऱ्या उपजिल्हाधिकारी शितल देशमुख,नायक तहसिलदार,श्रीकांत कवळे, लघुलेखक,सुनिल वाघ, वाहनचालक सतिश देसाई,शिपाई संजय मोरे, हमाल प्रदिप भोसले,सेवानिवृत्त  नायब तहसिलदार एकनाथ नाईक या  अधिकारी व कर्मचाऱ्यांना  महसूल मंत्री राधाकृष्ण विखे –पाटील यांच्या हस्ते  महसूल दिन गौरव प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. 

याप्रसंगी विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, अपर आयुक्त कोकण विभाग विवेक गायकवाड, उप आयुक्त महसूल कोकण विभाग व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Honours, officers and employees of Konkan Division by Revenue Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.