रुग्णालयांच्या इमारती धूळ खात पडून; नवी मुंबईकरांची गैरसोय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 11:41 PM2020-07-14T23:41:02+5:302020-07-14T23:52:33+5:30
उद्घाटन होऊन सात वर्षे झाल्यानंतरही या रुग्णालयांचा प्रश्न सोडविण्यात व पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात लोकप्रतिनिधी व प्रशासनास अपयश आले असून, महानगरपालिकेचेरु ग्णालय उपलब्ध नसल्याने शहरवासीयांची प्रचंड गैरसोय होत आहे.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : शहरवासीयांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने १७० कोटी रु पये खर्च करून ऐरोली, नेरुळ व बेलापूरमध्ये तीन रु ग्णालयांचे बांधकाम केले आहे. २५० बेड्सची क्षमता असलेल्या या रुग्णालयांमध्ये फक्त माता-बाल रुग्णालयच चालविले जात आहे. मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने सर्वसाधारण रु ग्ण सुरू करण्याचे उद्दिष्ट साध्य होऊ शकले नाही. उद्घाटन होऊन सात वर्षे झाल्यानंतरही या रुग्णालयांचा प्रश्न सोडविण्यात व पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात लोकप्रतिनिधी व प्रशासनास अपयश आले असून, महानगरपालिकेचेरु ग्णालय उपलब्ध नसल्याने शहरवासीयांची प्रचंड गैरसोय होत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने २००९ मध्ये नेरुळ व ऐरोलीमधील जुन्या माता-बाल रु ग्णालयांच्या जागेवर प्रत्येकी १०० बेड्सचे सर्वसाधारण रुग्णालय उभारण्याचे काम सुरू केले. बेलापूरमध्येही जिल्हा परिषदेकडून हस्तांतर केलेल्या आरोग्य केंद्राच्या जागेवर ५० बेड्सचे माता-बाल रुग्णालयाचे बांधकाम सुरू करण्यात आले. या तीनही रुग्णालयांचे बांधकाम दोन वर्षांत पूर्ण होऊन तेथे प्रत्यक्ष रु ग्णालय सुरू होणे अपेक्षित होते, परंतु विविध कारणांनी बांधकाम रखडत गेले व रुग्णालयांवरील खर्च वाढत गेला. नेरुळमधील रुग्णालयाच्या बांधकामासाठी ७२ कोटी ७४ लाख रुपये, ऐरोली रु ग्णालयासाठी ७४ कोटी ७४ लाख रु पये व बेलापूर रुग्णालयासाठी २३ कोटी १५ लाख रुपये खर्च करण्यात आले. तीनही रुग्णालयांच्या बांधकामासाठी जवळपास १७० कोटी ६३ लाख रु पये खर्च करण्यात आला. फर्निचर, वैद्यकीय उपकरणे व इतर कामांसाठीही ३५ कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे. २०१४च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी घाईगडबडीमध्ये या रुग्णालयांचे उद्घाटन करण्यात आले, परंतु प्रत्यक्षात २०१६ मध्ये ऐरोली व नेरुळमध्ये माता-बाल रु ग्णालय सुरू करण्यात आले. बेलापूरमध्येही गतवर्षी माता-बाल रुग्णालय सुरू केले आहे.
ऐरोली व नेरुळ रु ग्णालयाला १०० बेड्सची मंजुरी असली, तरी त्यांची क्षमता प्रत्येकी ३०० बेड्सची आहे. येथे सर्वसाधारण रु ग्णालय सुरू करण्यास महानगरपालिकेला अपयश आले आहे. सर्वसाधारण रु ग्णालयासाठी आवश्यक मनुष्यबळच पालिकेकडे उपलब्ध नाही. २००९ पासून पुरेशा मनुष्यबळाची भरती करता आलेली नाही. शासनाने आरोग्य विभागातील कर्मचारी भरतीला हिरवा कंदील दाखविल्यानंतरही वेळेत भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. सद्यस्थितीमध्ये वाशीतील सर्वसाधारण रु ग्णालय बंद करून तेथे डेडिकेटेड कोविड रु ग्णालय सुरू केले आहे. यामुळे मनपाचे एकही सर्वसाधारण रु ग्णालय सुरू नाही. मनपाचे रु ग्ण नेरु ळमधील डॉ.डी.वाय. पाटील रु ग्णालयात पाठविले जात आहेत. स्वत:च्या इमारती उपलब्ध असूनही मनुष्यबळ नसल्याने, पालिकेला ऐरोली व नेरु ळ रु ग्णालय सुरू करता येत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे.
नागरिकांमध्ये नाराजी : नवी मुंबई महानगरपालिकेने वाशीतील प्रथम संदर्भ रु ग्णालयाचे कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतर केले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मनपाचे सर्वसाधारण रु ग्णालय उपलब्ध नाही. खासगी रु ग्णालयातील उपचार परवडत नाहीत. मनपाकडून लवकर सर्वसाधारण रु ग्णालय सुरू करावे, अशी मागणी होत आहेत. मनपाचे रु ग्णालय बंद झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे.
बेलापूर रु ग्णालय
बेड क्षमता ५०
खर्च २३ कोटी १५ लाख
सद्यस्थिती माता-बाल
रु ग्णालय सुरू
ऐरोली रु ग्णालय
बेड क्षमता १००
खर्च ७४ कोटी ७४ लाख
बांधकाम सुरू २००९
ओपीडी सुरू २०१४
सद्यस्थिती माता-बाल
रु ग्णालय सुरू
मनुष्यबळ नसल्याने सर्वसाधारण रुग्णालय सुरू नाही.
नेरु ळ रु ग्णालय
बेड क्षमता १००
खर्च ७२ कोटी ७४ लाख
बांधकाम सुरू २००९
ओपीडी सुरू २०१४
सद्यस्थिती माता-बाल
रु ग्णालय सुरू
मनुष्यबळ नसल्याने सर्वसाधारण रुग्णालय सुरू नाही.