पनवेल : मुंबई तसेच पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या माध्यमातून आस्थापनांना नवीन नियमावली घालुन दिली आहे. मात्र तरी देखील काही आस्थापना नियमांचे उल्लंघन करीत असल्याने खारघर महानगरपालिका पनवेल यांचे पथकाने व खारघर पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कारवाईत खारघर परिसरातील हॉटेल भगत ताराचंद, हॉटेल व्हिलेज ,रिलायन्स स्मार्ट, हॉटेल जेजेस रसोई, हॉटेल बी क्रीम,शिवसागर हाॅटेल ,आकाया फर्निचर हे विहित वेळेपेक्षा उशिरापर्यंत सुरू ठेवताना आढळल्याने सील कारण्याची कारवाई केली गेली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी दिली.
नियमांचे उल्लंघन केल्याने खारघरमधील हॉटेल्स आणि फर्निचरचे दुकान सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 11:52 AM