सहा महिन्यांच्या बंदीनंतर हॉटेल व्यवसाय पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 12:19 AM2020-10-06T00:19:29+5:302020-10-06T00:19:49+5:30

कर्मचाऱ्यांची कमतरता; पहिल्या दिवशी थंड प्रतिसाद

Hotel business resumes after six months of ban | सहा महिन्यांच्या बंदीनंतर हॉटेल व्यवसाय पुन्हा सुरू

सहा महिन्यांच्या बंदीनंतर हॉटेल व्यवसाय पुन्हा सुरू

Next

- नामदेव मोरे 

नवी मुंबई : सहा महिन्यांच्या बंदीनंतर हॉटेल सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. सोमवारी पहिल्या दिवशी अनेकांनी स्वच्छता व इतर कामे करण्यास प्राधान्य दिले. जी हॉटेल सुरू झाली, तेथेही ग्राहकांचा थंड प्रतिसाद असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.

शासनाने पहिला लॉकडाऊन जाहीर केल्यापासून नवी मुंबईमधील लहान-मोठी जवळपास तीन हजार हॉटेल बंद करण्यात आली. सहा महिन्यांत जवळपास १,२०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. हॉटेल भाडेतत्त्वावर चालविणाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पुन्हा हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. काम करण्यासाठी कर्मचाºयांची कमतरता आहे. बंद असल्यामुळे देखभाल-दुरुस्तीचा खर्चही वाढला असून, इतरही समस्या निर्माण झाल्या आहेत.

घेतली जाणारी दक्षता : हॉटेलमध्ये येणाºया सर्वांना सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात येत आहे. तापमान तपासण्याचीही सुविधा उपलब्ध करून दिली असून, आॅक्सिजनची पातळीही तपासली जात आहे.

हॉटेलमध्ये गर्दी होणार नाही, याची काळजी घेतली जाणार असून, क्षमतेपेक्षा ५० टक्के ग्राहकांसाठीची आसनव्यवस्था केली जात आहे.

स्थानिक प्रशासनाने घालून दिलेली बंधने
महानगरपालिकेने ५० टक्के क्षमतेने हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिली आहे, परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये हॉटेलमध्ये गर्दी होणार नाही. मास्क, सॅनिटायझरचा वापर व इतर नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत.

हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिल्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे, परंतु नागरिकांनी व हॉटेल चालकांनीही हॉटेलमध्ये गर्दी होणार नाही व कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी घ्यावी.
-प्रशांत पवार,
ग्राहक

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून सर्वाधिक नुकसान हॉटेल व्यावसायिकांचे झाले आहे. कटू आठवणी विसरून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करत आहोत. नियमांचे पालन करून हॉटेल सुरू ठेवले जाईल.
-अशोक वाळूंज,
हॉटेल व्यावसायिक

दर जैसे थे?
कोरोनामुळे हॉटेल व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पुन्हा हॉटेल सुरू केल्यानंतर हॉटेलच्या मेनूच्या दरामध्ये बदल करण्यात आलेले नाही. पूर्वीचेच दर ठेवण्यात आले आहेत. यापुढे ग्राहकांचा प्रतिसाद कसा मिळतो, यावर दर अवलंबून राहतील.

Web Title: Hotel business resumes after six months of ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.