नशेबाजीला विरोध केल्यानेमुलाने सोडले घर

By admin | Published: January 13, 2017 06:09 AM2017-01-13T06:09:14+5:302017-01-13T06:09:14+5:30

नशा करणाऱ्या १४ वर्षीय मुलाने घरातील मंडळींनी या गोष्टीला विरोध केला म्हणून घरच सोडले

The house left after opposing drunkenness | नशेबाजीला विरोध केल्यानेमुलाने सोडले घर

नशेबाजीला विरोध केल्यानेमुलाने सोडले घर

Next

रोहा : येथील नशा करणाऱ्या १४ वर्षीय मुलाने घरातील मंडळींनी या गोष्टीला विरोध केला म्हणून घरच सोडले. हा धक्कादायक प्रकार रोहे शहरातील वरचा मोहल्ला परिसरात घडला आहे. या घटनेची माहिती मुलाच्या आईने पोलिसांना दिली आहे.
रोहे शहरात चरस, गांजा, अफीम आदी मादक पदार्थ चढ्या भावात
विक्री करणारी टोळी वावरत आहे. अमली पदार्थांच्या काळ्याबाजारात महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या अमली पदार्थांच्या नशेत शहरातील अनेक तरुण अडकले आहेत. त्यातच रोहा वरचा मोहल्ला येथील १४ वर्षीय मुलगा नशेच्या आमरी गेला. या गोष्टीला घरच्या मंडळींनी विरोध केल्याने रागाच्या भरात तो १ ते ८ आॅक्टोबर, २०१५ या दरम्याने घरातून निघून गेला आहे. याबाबत रोहा पोलीस ठाण्यात नोंद केली आहे.

Web Title: The house left after opposing drunkenness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.