शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
3
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
4
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
6
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
7
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
8
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
9
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
10
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

गृहनिर्माण संस्थेची बनवेगिरी

By admin | Published: August 03, 2015 3:25 AM

कोपरखैरणेतील एका गृहनिर्माण संस्थेने नगररचना विभागाने दिलेल्या परवानगीला फाटा देत मंजुरीपेक्षा दुप्पट सदनिका बांधल्याचा धक्कादायक

कमलाकर कांबळे , नवी मुंबईकोपरखैरणेतील एका गृहनिर्माण संस्थेने नगररचना विभागाने दिलेल्या परवानगीला फाटा देत मंजुरीपेक्षा दुप्पट सदनिका बांधल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात सातत्याने तक्रारी करून सुध्दा महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे संस्थेच्या एका सदस्याने आता थेट न्यायालयात धाव घेतली आहे.सिडकोकडून लिजवर मिळालेल्या कोपरखैरणे सेक्टर १ येथील भूखंड क्रमांक ८७ वर ‘सेना सहकारी गृहनिर्माण संस्थे’ने सहा मजली निवासी इमारत बांधली आहे. मात्र ही इमारत उभारताना संबंधित संस्थेने सिडको व महापालिकेच्या सर्व नियमांना हरताळ फासल्याचे उघड झाले आहे. संस्थेचे एक सदस्य संजय मधुकर कोचरेकर यांनी माहितीच्या अधिकारातून संस्थेची ही बनवेगिरी उघडकीस आणली आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाने संस्थेला या भूखंडावर १0 निवासी सदनिका आणि २ व्यावसायिक गाळे बांधण्याची परवानगी दिली होती. मात्र संस्था आणि विकासकाने मंजूर मूळ नकाशात बदल करून २0 निवासी व ६ वाणिज्य युनिटचे बांधकाम केले आहे. त्याचबरोबर या इमारतीतील बहुतांशी सदनिकाधारकांनी अतिक्रमण केल्याचे दिसून आले आहे. अनेकांनी ओपन टेरेसवर पक्के किंवा कच्च्या स्वरूपाचे बांधकाम करून त्याचा रहिवासी वापर सुरू केला आहे. तर काहींनी फ्लॉवर बेडमध्ये अनधिकृत बांधकामे केली आहेत. या सर्व अतिक्रमणांवर कारवाई करावी, यासाठी कोचरेकर हे मागील दोन-अडीच वर्षांपासून महापालिकेच्या संबंधित विभागाकडे पाठपुरावा करीत आहेत. कोचरेकर यांच्या तक्रारीची दखल घेत महापालिकेच्या कोपरखैरणे विभाग कार्यालयाने २५ आॅक्टोबर २0१२ रोजी अतिक्रमण करणाऱ्या सोसायटीतील १६ सदनिकाधारकांना एमआरटीपी अ‍ॅक्टअंतर्गत नोटिसा बजावल्या. मात्र तीन वर्षे झाली तरी या अतिक्रमणांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. विशेष म्हणजे याप्रकरणी सिडकोनेही संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. असे असले तरी प्रत्यक्षात मात्र कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. कारवाईसंदर्भात प्रशासनाकडून जाणीवपूर्वक चालढकल केली जात असल्याचा आरोप करीत कोचरेकर यांनी आता थेट न्यायालयात धाव घेतली आहे.