बँकेच्या लॉकरपर्यंत गुन्हेगार पोहोचलेच कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 02:39 AM2017-11-22T02:39:01+5:302017-11-22T02:39:17+5:30

नवी मुंबई : बडोदा बँक लुटल्याची घटना गंभीर असून, लॉकरपर्यंत गुन्हेगार पोहोचलेच कसे याचे आश्चर्य सेवानिवृत्त अप्पर पोलीस महासंचालक रामराव वाघ यांनी व्यक्त केले आहे.

How do the culprit reach bank lockers? | बँकेच्या लॉकरपर्यंत गुन्हेगार पोहोचलेच कसे?

बँकेच्या लॉकरपर्यंत गुन्हेगार पोहोचलेच कसे?

Next

नवी मुंबई : बडोदा बँक लुटल्याची घटना गंभीर असून, लॉकरपर्यंत गुन्हेगार पोहोचलेच कसे याचे आश्चर्य सेवानिवृत्त अप्पर पोलीस महासंचालक रामराव वाघ यांनी व्यक्त केले आहे. लॉकर फोडण्याच्या घटना तुरळक असून, पोलीस अत्यंत वेगाने तपास करत असल्याचेही ते म्हणाले. वर्षभरात उघडकीस आलेल्या गुन्ह्यांमधील जप्तीचा ऐवज संबंधितांना वाटप करण्याच्या कार्यक्रमास ते वाशी येथे उपस्थित होते.
घडलेल्या विविध प्रकारच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांची प्रतिष्ठा पणाला लागत असते. अशावेळी तपासकौशल्य व तांत्रिक बाबींचा वापर करून गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांची कसोटी लागलेली असते. या सर्व आव्हानांवर मात करत वर्षभरात उघड केलेल्या ८७ गुन्ह्यांमध्ये १ कोटी ९३ लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. त्यामध्ये २००७ पासून ते २०१७ दरम्यान घडलेल्या घरफोडी, सोनसाखळी चोरी, वाहन चोरी, लूट अशा विविध गुन्ह्यांचा समावेश आहे. गुन्हे शाखा, परिमंडळ एक व दोन या पोलिसांंनी उघडकीस आणलेले हे गुन्हे आहेत. या गुन्ह्यांची तपासाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलिसांकडून संबंधितांना त्यांचा ऐवज परत करण्यात आला. याकरिता वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित सेवानिवृत्त अप्पर पोलीस महासंचालक रामराव वाघ यांनी गत आठवड्यात घडलेल्या बडोदा बँक लुटीच्या घटनेचे गांभीर्य व्यक्त केले. लॉकर लुटण्याच्या घटना कमी आहेत, मात्र गुन्हेगार लॉकरपर्यंत पोचलेच कसे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
नवी मुंबई पोलिसांनी गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याची परंपरा जोपासली असल्याचेही गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी ऐरोली येथील बँकेवर दरोडा टाकणाºयांसोबत झालेल्या झटापटीत शहीद झालेल्या बाबासाहेब आढाव यांच्या स्मृतींना देखील त्यांनी उजाळा दिला. राज्यातच लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी असल्याने, गुणवत्तापूर्ण काम दाखवण्याचे अवघड होत आहे. त्यानंतरही चोरीला गेलेला ऐवज परत मिळवून तो संबंधितांना परत करण्यातच पोलिसांचे सुख असल्याचेही ते म्हणाले. याप्रसंगी कार्यक्रमास पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सह आयुक्त प्रशांत बुरडे, उपआयुक्त प्रवीण पवार, तुषार दोषी, नितीन पवार, राजेंद्र माने यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या वेळी चोरीचा ऐवज परत मिळेल याची आशा नसतानाही, पोलिसांनी तो मिळवून दिल्याचा आनंद नागरिकांनी व्यक्त केला.
>नवी मुंबई पोलिसांनी गुन्हे उघडकीस आणण्याची परंपरा जपलेली आहे. यामुळे उच्च स्तरावर त्यांची प्रतिमा उजळ झालेली आहे. याच गोपनीय अहवालानुसार राज्यात प्रथमच ‘लोकमत’ने एप्रिल महिन्यात नवी मुंबई पोलीस दलातील उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाºयांना सन्मानित केले होते. या कार्यक्रमाचा देखील उल्लेख निवृत्त अप्पर पोलीस महासंचालक रामराव वाघ यांनी आवर्जून केला.
घडलेल्या गुन्ह्याची उकल करून पोलिसांनी गुन्हेगारांकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला. तक्रारदाराला त्यांचा मुद्देमाल परत करताना पोलीस अधिकारी.

Web Title: How do the culprit reach bank lockers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.