Maratha Reservation: गुन्हे दाखल केल्यावर नोकऱ्या कशा मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 05:21 AM2018-08-06T05:21:03+5:302018-08-06T05:21:38+5:30
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनात राज्यात ७,५०० तरुणांवर हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत.
नवी मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनात राज्यात ७,५०० तरुणांवर हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत. यामुळे भविष्यात आरक्षण मिळाले, तरी गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यांना नोकºया कशा मिळतील, असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केला. मनसे कामगार सेनेच्या वाशीतील मेळाव्यात ते बोलत होते.
महाराष्टÑात सध्या मराठापाठोपाठ इतर जातींच्या आरक्षणाचा मुद्दा पेटत आहे. परंतु सर्वच राजकीय पक्षांकडून आरक्षणाचे केवळ राजकारण केले जात आहे. एकीकडे तरुणांना पेटवायचे आणि दुसरीकडे त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे. या वृत्तीमुळे गेल्या काही दिवसांत मराठा आरक्षणाच्या झालेल्या आंदोलनांमध्ये राज्यातील ७,५०० तरुणांवर हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
आंदोलनांत सहभागी होऊन हिंसा पसरवणारे परप्रांतीय असल्याचे तपासात समोर येत आहे. मात्र, त्यांच्या कृत्यामुळे महाराष्टÑ बदनाम होत असल्याचे ते म्हणाले. देशात २४ लाख रोजगार उपलब्ध असतानाही सरकार भरती करत नसल्याच्या नेमक्या कारणांबद्दल त्यांनी संशय व्यक्त केला.
रस्त्यांवर गणेशोत्सव साजरा करण्याबाबत लादल्या जात असलेल्या मर्यादांबाबत त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले. छोट्याशा जागेतच गणपती बसवायचे असतील तर कपाटात बसवायचे का? असा टोलाही त्यांनी लगावला. रस्त्यावरील नमाज बंद केले जात नसल्याने सर्वधर्मीयांना सारखाच न्याय हवा असल्याचे उद्गार त्यांनी काढले.
महाराष्टÑात बांगलादेशींचे मोहल्ले उभे राहत आहेत. त्याकरिता राज्याबाहेरून परप्रांतीयांचे लोंढे आणून झोपड्या उभारल्या जात असून, त्यांना एसआरएसारखी योजना देण्याच्या निमित्ताने पैसे कमवायचा धंदा सुरू असल्याचीही टीका ठाकरे यांनी केली.
या वेळी मनसे नेता बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, अभिजित पानसे, आदित्य शिरोडकर, रिटा गुप्ता, संदीप देशपांडे, गजानन काळे आदी उपस्थित होते.
>नवी मुंबई पालिका कर्मचाºयांची कानउघाडणी
राज ठाकरे यांनी मनसेतर्फे नवी मुंबईला ५० हजार कोटींची घोषणा केली, तसेच नवी मुंबई पालिका कर्मचाºयांचीही कानउघाडणी केली. केवळ पगारासाठी नोकरी करू नका. राज्य व देशाचे जागते पहारेकरी बनण्याचा सल्ला दिला. मात्र, पहारेकरी हा मोदींसारखा नसावा, असा चिमटा त्यांनी काढला.